Turmeric and black pepper benefits: स्वयंपाकघरातील मसाले हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात, जे आरोग्यावर फायदेशीर परिणाम करतात. हळदीला सोनेरी मसाला म्हणून ओळखले जाते. हा मसाला अन्नाची चव आणि सुगंध दोन्ही वाढवतो. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत जे असंख्य अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहेत. हजारो वर्षांपासून आयुर्वेदात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्याचा वापर केला जात आहे. पण, जेव्हा हळद काळी मिरीसोबत मिसळली जाते तेव्हा त्याची प्रभाविता अनेक पटीने वाढते. हळदीसोबतच काळी मिरी हा औषधी गुणधर्म असलेला मसालादेखील आहे.
बहुतेक लोक काळी मिरी फक्त मसाला म्हणून ओळखतात, परंतु त्याचे अनेक आरोग्य फायदेदेखील आहेत. हेल्थलाइनच्या मते, हळद आणि काळी मिरीमध्ये सक्रिय घटक असतात, जे शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतात. या दोन्ही मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत, जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हळद आणि काळी मिरी यांचे मिश्रण खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया.
हळदीमध्ये कर्क्यूमिनचे परिणाम
कर्क्यूमिन हे हळदीमध्ये सर्वात सक्रिय आणि शक्तिशाली संयुग आहे. ते अनेक फायदेशीर गुणधर्मांसह एक पॉलीफेनॉल आहे. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीनाशक आहे.
काळी मिरीमध्ये पाइपरिनचे परिणाम
काळ्या मिरीमध्ये आढळणारे पाइपरिन हे एक जैविकदृष्ट्या सक्रिय संयुग आहे, जे कॅप्सेसिनसारखेच एक अल्कलॉइड आहे. पाइपरिन हे एक संयुग आहे जे मळमळ, डोकेदुखी आणि अपचन यापासून आराम देते आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्मदेखील आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते हळदीच्या कर्क्यूमिनचे शोषण २०००% पर्यंत वाढवते.
पाइपरिन कर्क्युमिनचे परिणाम कसे वाढवते
कर्क्युमिन सामान्यतः शरीराद्वारे खूप कमी प्रमाणात शोषले जाते, म्हणून त्याचे फायदे मर्यादित असतात. तथापि, जेव्हा तुम्ही हळदीला काळी मिरीसोबत एकत्र करता, म्हणून पाइपरिन त्याची जैवउपलब्धता लक्षणीयरीत्या वाढवते. एका अभ्यासानुसार, २० मिलीग्राम पाइपरिनसोबत २ ग्रॅम कर्क्युमिन घेतल्याने त्याचे शोषण २० पटीने वाढते. पाइपरिन कर्क्यूमिन आतड्यांतील भिंतीतून रक्तप्रवाहात अधिक सहजपणे जाण्यास मदत करते. ते यकृतातील कर्क्युमिनचे विघटन कमी करते, ज्यामुळे ते शरीरात जास्त काळ सक्रिय राहते.
हळद आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे फायदे
कर्करोग रोखते
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कर्क्युमिन कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत करू शकते. पाइपरिन विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास आणि ट्यूमरचा धोका कमी करण्यासदेखील मदत करू शकते. दोन्ही मसाले एकत्र खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट, स्वादुपिंड आणि कोलन कर्करोग टाळता येतो
जळजळ आणि वेदना कमी करते
हळद आणि काळी मिरी दोघांचेही स्वतःचे फायदे आहेत, परंतु एकत्र घेतल्यास त्यांचे परिणाम अनेक पटीने वाढतात. हळदीतील कर्क्युमिनमध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म असतात. असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की, त्याचा वापर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांइतकाच प्रभावी असू शकतो. यामुळे संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. पाइपरिनमध्ये संधीवातविरोधी गुणधर्मदेखील आहेत आणि ते शरीरातील वेदना रिसेप्टर्सना शांत करते, ज्यामुळे वेदना आणि जळजळ दोन्हीपासून आराम मिळतो.
.
पचन सुधारते
पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदात शतकानुशतके हळदीचा वापर केला जात आहे. ते गॅस, अपचन आणि आतड्यांतील पेटके यांसारख्या समस्यांपासून मुक्त होते. काळी मिरी पाचक एंझाइम सक्रिय करते, अन्नाचे पचन आणि शोषण जलद करते. दोन्हींच्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे आतड्यांमधील दाह कमी होतो आणि पोट निरोगी राहते.
