Home remedies for cough: कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ कप सिरपचं सेवन केलेल्या १२ मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच लहान मुलांना कप सिरप देऊ नका, असा सल्ला देत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. दरम्यान जिथे पाहावं तिथे सर्दी, खोकला, ताप, कफ झाल्याच्या तक्रारी करणारे रुग्ण दिसतायत. डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर तर पेशंट्सच्या रांगा दिसू लागल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी अगदी गंभीर स्थिती नसल्यास किंवा काही जुनाट आजार नसल्यास आपण प्रथमोपचार म्हणून काही घरगुती उपाय करू शकतात. चला तर मग सर्वात आधी कफ मोकळा करणारे उपाय पाहूया..

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळा

डॉक्टरांनी सर्वप्रथम दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे.कफ कमी करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ टाळावे. कारण श्लेष्माचे उत्पादन वाढवण्यासाठी किंवा अगोदरच श्वास नलिकेत साचलेला कफ घट्ट करण्यासाठी दूध कारणीभूत ठरू शकते. यामुळे घशात अस्वस्थता (खवखव) जाणवू शकते. दुधाचे सेवन कमी केल्याने संबंधित लक्षणे कमी होऊ शकतात.

काळी मिरी पावडर

तिसरा उपाय म्हणजे १० ते १२ काळी मिरीचे दाणे मधात भिजवून ठेवा, पावडर करू नका पण वाटल्यास जाडी भरड काढून घ्या. रात्रभर ८ ते १२ तास मिरी व मधाचे मिश्रण तसेच ठेवा व सकाळी चावून खा. मिरपूड/काळी मिरी, ही ‘कफनाशक गुणधर्मासाठी’ ओळखली जाते. काळ्या मिरीयामध्ये पाइपरिनसारखी संयुगे असतात जी श्लेष्मा पातळ करण्यास मदत करतात आणि श्वसनमार्गातून कफ बाहेर काढण्यास मदत करतात.

हळदीचे सेवन

चौथा व शेवटचा उपाय म्हणजे हळद. जर तुम्हाला दमा, सायनस किंवा श्लेष्माशी संबंधित आजार असतील तर तुम्ही हळद खाऊन कफ कमी करू शकता, विशेषत: मिरपूड, कडुलिंब, ओव्याची पानं हळदीसह मिसळून आपण वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या स्वरूपात खाऊ शकता.”

ओव्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. ओव्यामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात म्हणूनच ओवा हा अनेक आजारांवर परिणामकारक उपाय ठरतो. ओव्याच्या वासामुळे छातीत साचलेला कफ विरघळून बाहेर पडण्यास मदत होते. छातीचा पिंजरा साफ होऊन कफपासून आराम मिळतो. पोटासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी सुद्धा ओव्याचा वापर केला जातो.

पुरचुंडी तयार करण्याची पद्धत

  • अर्धी वाटी ओवा तव्यावर किंवा पॅनमध्ये वास सुटेपर्यंत नीट भाजून घ्या.
  • सूती कापडामध्ये भाजलेला ओवा बांधुन त्याच्या पुरचुंड्या तयार करुन घ्या. तीन ते चार पुरचुंड्या तयार करणे हे जास्त फायद्याचे ठरेल.
  • पुरचुंडी सुटू नये म्हणून ती घट्ट बांधा.
  • बाळाच्या आजूबाजूला या पुरचुंड्या नीट पसरवून ठेवा.
  • ओव्याच्या वासामुळे बाळाची सर्दी कमी होते. हा उपाय नक्की ट्राय करा
  • हायड्रेटेड रहा: श्लेष्मल पातळ करण्यासाठी पाणी, हर्बल टी किंवा मटणाचा कोमट रस्सा/ सूप अशा द्रवपदार्थांचे सेवन करा
  • वाफ घ्या: गरम पाण्यातून किंवा शॉवर दरम्यान वाफ घेतल्याने नाक चोंदण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
  • मिठाच्या पाण्याने गुळण्या: कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा खवखवणे कमी होते व कफ बाहेर पडतो.
  • ह्युमिडिफायरचा वापर: ह्युमिडिफायर वापरल्याने हवेत आर्द्रता वाढते, अनुनासिक परिच्छेद ओलसर राहतो आणि कफ कमी उत्पादित होतो.
  • सिगारेटचा धूर, उग्र गंध आणि इतर त्रासदायक पदार्थांपासून दूर रहा
  • संतुलित आहार ठेवा, नियमित व्यायाम करा आणि तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यावर भर द्या.
  • यानंतरही त्रास कमी न झाल्यास आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.