Happy Chocolate Day: चॉकलेट डे हा व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे. हा चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन त्यांच्या प्रेमात गोडवा वाढवतात. तुम्हालाही तुमच्या जोडीदाराचा हा दिवस खास बनवायचा असेल, तर आजच त्यांना चॉकलेट गिफ्ट करा. पण तुम्हाला माहित आहे का चॉकलेट डे कधी सुरू झाला आणि या दिवशी कुणाला चॉकलेट देण्याचा अर्थ काय? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला चॉकलेट डेची खासियत आणि इतिहास सांगत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चॉकलेट डे’चा इतिहास

चॉकलेटचा इतिहास सुमारे ४ हजार वर्षांचा आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की त्याचा शोध प्रथम अमेरिकेत लागला. अमेरिकेच्या जंगलात चॉकलेटच्या बियाणांपासून चॉकलेट बनवले गेले. तर चॉकलेट डे हा प्रथम ख्रिश्चन मेजवानीचा दिवस म्हणून साजरा केला गेला. ज्यामध्ये सेंट व्हॅलेंटाइन तसेच इतर ख्रिश्चन संतांना व्हॅलेंटाईन म्हटले गेले. अनेक देशांमध्ये हा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. व्हिक्टोरियन काळापासून, प्रेमात असलेल्या पुरुष आणि स्त्रिया एकमेकांना भेटवस्तू देणाऱ्या भेटवस्तूंमध्ये चॉकलेटचा एक मोठा भाग होता.

चॉकलेटचे फायदे

चॉकलेट हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की चॉकलेट खाल्ल्याने लव्ह लाईफ चांगली राहते. चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन आणि कॅफिन असते, जे मन ताजेतवाने करतात आणि मेंदूतील एंडोर्फिनचा स्राव वाढवतात, ज्यामुळे आनंदाची भावना येते. चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो.

चॉकलेट डे ‘असा’ साजरा करु शकता

चॉकलेट डे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे साजरा करू शकता. सर्वप्रथम, चॉकलेट डेशी संबंधित एक गोड मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या जोडीदाराला शुभेच्छा देऊ शकता. यानंतर, तुम्ही त्यांना भेटता तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीचे कोणतेही चॉकलेट भेट देऊ शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगल्या स्पामध्ये चॉकलेट मसाज घेऊ शकता. संध्याकाळी चॉकलेट केक देऊन तुम्ही त्यांना शुभेच्छा करू शकता. जर तुमचा पार्टनर चॉकलेट डेच्या दिवशी तुमच्यापासून दूर असेल तर तुम्ही त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये चॉकलेट पाठवून त्यांना आश्चर्यचकित करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the fascinating history of chocolate day which is celebrated on the third day of valentine week ttg