ऋतू बदलला की, शरिराचं तापमान देखील बदलते. शरिरात बरेच बदल होतात. आता दिवाळीचा उत्सव सुरू असताना मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजेची धम्माल सुरू आहे. याचा आपल्या शरिरावर प्रतिकुल परिणाम होतोच. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे श्वसनावर याचा विपरित परिणाम होतोच. मात्र, हा परिणाम त्वरित जाणवत नाही. परंतु काही काळाने तो जाणवायला लागतो. त्यामुळं यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे शरिराची देखभाल अर्थातच स्वत:ची काळजी घेणे.

दिवाळीत सर्वात जास्त प्रदुषण हे फटाक्यांमुळेच होते. अनेक तऱ्हेचे आवाज आणि धूर करणारे फटाके फोडल्या जातात. या प्रदुषणरहीत फटाक्यांच्या संपर्कात आल्यानं आपल्या फुफ्फुसावर त्याचा विपरित परिणाम होतो. आपलं फुफ्फुस आजारी पडतं. त्यासाठी प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क घालणे, किंवा नाकावाटे रुमाल बांधणे, या वस्तूंचा वापर करणे. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी, तुम्ही स्वतःला तुम्ही शरीराच्या आतूनही सुरक्षित केले पाहिजे. याप्रकारे काळजी घ्या.

आणखी वाचा : ‘हे’ तीन पेय तुमचं वजन वाढू देणार नाही; वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘उत्तम उपाय’

सुदृढ फुफ्फुस ठेवण्यासाठी ‘हे’ करा !

झोपण्यापूर्वी गुळाचं सेवन करा

गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. गुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते, जी अपल्या गळयाला आणि फुफ्फुसाला सुरक्षित करते. रात्री झोपण्यापूर्वी गुळाचा तुकडा आणि कोमट पाणीचे सेवन केल्याने श्वसनाचे आजार कमी होतात. पाणी तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. श्वसनाचे विकार दूर राहण्यासाठी गुळाचे आवर्जून सेवन करा.

‘क’जीवनसत्त्वांचा आहारात समावेश करा

लिंबू, आवळा, संत्री यांसारखी व्हिटॅमिन सी फळे सेवन करणे. ही फळे फुफ्फुस स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच लिंबू आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त फळ आहे. म्हणूनच लिंबू आणि या फळाचा आहारात समावेश करावा. यामुळं श्वसन क्रिया योग्य होईल. त्याचबरोबर आल्याचा रस तुमच्या घशासाठी उपयुक्त असतो. म्हणून आल्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात समावेश केल्याने आरोग्य निरोगी राहील.

दिवाळीत तेलकट पदार्थ टाळाच !

सदृुढ शरीर आणि निरोगी फुफ्फुस ठेवण्यासाठी दिवाळीत तेलकट पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे. यामुळे मोठया प्रमाणावर श्वसनाचे आजार होऊ शकतात. दिवाळीतल्या चविष्ट पदार्थांचा मोह तुम्हाला श्वसन रोगांना आमंत्रण देतो.