Home Remedies for Clean Stomach: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. अस्वच्छ आहार आणि बेजबाबदार जीवनशैलीमुळे शरीर कमकुवत होत चालले आहे, त्याचबरोबर अनेक आजारांचे जाळे आपल्याला वेढून टाकत आहे. उशिरापर्यंत जागरण, सततचा ताण… पोटावरची चरबी वाढणे, थकवा येणे, पचनशक्ती बिघडणे हे आता सर्वसामान्य झाले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण महागडे उपाय करतात, पण फारसा फरक पडत नाही. मात्र, घरातल्या छोट्याशा स्वयंपाकघरातच असा उपाय दडलेला आहे, जो शरीरासाठी अमृतासमान ठरतो.
आहारतज्ज्ञ सोनिया नारंग सांगतात, स्वयंपाकघरातच असा एक छोटासा गुप्त मसाला दडलेला आहे, जो एक ग्लास पाण्यात टाकल्यावर शरीरासाठी चमत्कार घडवतो. आयुर्वेदात याला नैसर्गिक औषध म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या मते हे पाणी शरीर स्वच्छ करते, पचनशक्ती सुधारते, तोंडाला ताजेपणा देते आणि वजन घटवण्यात मदत करते.
आपण दररोज पाणी तर पितोच, पण जर त्या साध्या पाण्यात फक्त हा मसाला टाकला तर त्याचे परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही केवळ मसाल्याची वस्तू नाही, तर औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी नैसर्गिक देणगी आहे. तिच्यातील सुगंधी तेल आणि पोषक घटक शरीर शुद्ध करण्याचे काम करतात.
१. पोटाशी निगडित त्रास दूर होतो
हा मसाला टाकलेले पाणी पाचक रसांचे उत्पादन वाढवतो. अपचन, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर होतात. सकाळी उठल्यावर ज्यांना जडपणा जाणवतो, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे वरदान आहे.
२. तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते
तोंडाला येणारी दुर्गंधी हा अनेकांचा त्रास. या मसाल्यात असलेले नैसर्गिक जंतुनाशक गुण तोंडातील जंतूंचा नाश करतात, त्यामुळे श्वास सुगंधी होतो आणि मसूडे, दातदुखी यांनाही आराम मिळतो.
३. वजन कमी होते
या मसाल्याचे पाणी शरीरातील चयापचय वेगवान करते, त्यामुळे अतिरिक्त चरबी वितळते, विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि वजन कमी होऊ लागते.
४. दुखणे-सूज कमी होते
सांधे, स्नायू आणि हाडांमधील वेदना यावर हा उपाय फायदेशीर आहे.
५. सर्दी-खोकल्यावर संरक्षण
थंडीमध्ये होणाऱ्या खोकल्यावर, घसा बसण्यावर हे पाणी ढाल म्हणून कार्य करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, शेवटी हा कोणता मसाला आहे? तर उत्तर अगदी साधं आहे – लवंग!
होय, रोज सकाळी एक ग्लास पाण्यात फक्त दोन लवंगा टाकून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन सुधारतं, वजन घटतं आणि शरीर निरोगी राहतं.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)