प्रत्येकजण तंदुरुस्त राहण्यासाठी, एक उत्तम जीवनशैली अंगिकारण्यासाठी आपल्या आहाराची वेळ काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करतात. योग्य वेळी योग्य तो आहार घेतल्याने त्याचे आपल्या शरीराला फायदे असतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र काही पदार्थ खाण्याची ठराविक वेळ असते. ती वेळ योग्यरीत्या पाळल्याने, खाल्ल्या किंवा प्यायला जाणाऱ्या पदार्थाचे आपल्या शरीराला अधिक फायदे होऊ शकतात.

असाच एक पदार्थ म्हणजे, दूध. काहींना सकाळी उठल्यावर दूध पिण्याची सवय असते; तर काहींना रात्री झोपण्याआधी. मात्र दूध पिण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल आप थोडक्यात माहिती पाहू.

हेही वाचा : Skin care : केवळ पूजेसाठी नव्हे, तर त्वचेसाठीही करा तुळशीचा वापर! पाहा या पाच टिप्स

“दूध प्यायलानंतर त्यामध्ये असणाऱ्या विशिष्ट घटकांमुळे आपल्या शरीराला आराम मिळतो. तसेच त्यामधील घटकांमुळे अत्यंत शांत आणि छान झोप लागण्यास मदत होते.” असे न्यूट्रसी लाइफस्टाइलच्या संस्थापक, एमबीबीएस आणि पोषणतज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटीलने सांगितले आहे. तसेच दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि त्याचे शरीराला कोणते फायदे होतात, त्याच्या टिप्सदेखील दिल्या आहेत. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते.

दूध पिण्याची वेळ आणि दुधाचे फायदे.

दुधामध्ये ड जीवनसत्त्वे, कॅल्शियम हे घटक भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, जे हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर असते. त्यामुळे, संध्याकाळी, झोपण्यापूर्वी दूध पिण्याने त्यामधील हे महत्वाचे घटक शरीरात अधिक प्रमाणात शोषले जातात. ज्याचा चांगला परिणाम हाडे, दात आणि एकंदरीत आरोग्यावर होतो. मात्र दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रत्येकालाच पचतात असे नाही. त्यामुळे ज्यांना गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचा त्रास होतो ते सोया किंवा बदामाचे दूध पिऊ शकतात.

हेही वाचा : डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर डाग? ‘ही भाजी’ घेईल केस अन् त्वचेची काळजी, या ६ टिप्स पाहा

मात्र, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या आवडीनुसार तसेच, पचनशक्तीचा विचार करून आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश करावा. मात्र त्या दूधामधील सर्व पोषक घटकांचा शरीराला फायदा करून घ्यायचा असल्यास, दूध योग्यवेळी पिणे आवश्यक आहे. एकंदरीत सर्व गोष्टी विचारात घेता संध्याकाळी, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे फायद्याचे ठरते, असे दिसते.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]