रक्तदाब कमी होणे म्हणजेच हायपोटेन्शन (Hypotension) ही अशी अवस्था आहे जेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सामान्यापेक्षा कमी होतो. त्यामुळे हृदय, मेंदू आणि इतर अवयवांपर्यंत पुरेशी ऑक्सिजन पोहोचत नाही. साधारण रक्तदाब १२०/८० mmHg एवढा असतो, पण जेव्हा तो ९०/६० mmHg पेक्षा खाली जातो तेव्हा त्याला लो ब्लड प्रेशर म्हटलं जातं.

यामुळे शरीरात चक्कर येणे, डोके सुन्न झाल्यासारखे वाटणे, थकवा, अशक्तपणा, धूसर दिसणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, जलद आणि उथळ श्वासोच्छ्वास अशी लक्षणे दिसू शकतात. काहीवेळा तर रुग्ण बेशुद्धही होतो. त्वचा थंड पडते आणि पिवळसर दिसते, तसेच उदासीनतेची भावना (डिप्रेशन) देखील जाणवू शकते.

रक्तदाब कमी का होतो?

रक्तदाब कमी होण्याची अनेक कारणे आहेत –

  • दीर्घकाळ उपाशी राहणे
  • शरीरात पाण्याची कमतरता
  • रक्ताची कमतरता (ऍनिमिया)
  • हृदयाची कमजोरी
  • हार्मोनल असंतुलन
  • गर्भावस्था
  • व्हिटॅमिन बी१२ आणि फॉलिक अॅसिडची कमतरता
  • काही औषधांचे दुष्परिणाम

कमी रक्तदाबासाठी सुकामेव्याचा फायदा

‘हेल्थलाइन’च्या अहवालानुसार, ज्यांचा रक्तदाब नेहमीच कमी राहतो त्यांनी आपल्या आहारात काही आरोग्यदायी सूक्या मेव्याचा समावेश करावा. यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुधारतात आणि हृदय मजबूत ठेवतात.

चला जाणून घेऊया — कोणते ड्रायफ्रूट्स लो बीपीला नॉर्मल करण्यास मदत करतात

१. बदाम (Almonds)

‘Medical News Today’ च्या माहितीनुसार, बदामात मॅग्नेशियम, कॅल्शियम, हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन E मुबलक प्रमाणात असतं. हे घटक नसांना रिलॅक्स करून रक्तप्रवाह सुधारतात. त्यामुळे चक्कर येणे किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे कमी होतात.

कसे खावे: रोज सकाळी ४-५ बदाम भिजवून रिकाम्या पोटी खा. याने ऊर्जा वाढते, हृदय मजबूत राहते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.

२. मनुका / किशमिश (Raisins)

किशमिशमध्ये आयरन, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे लो बीपी आणि ऍनिमिया असणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात.

कसे खावे: रोज सकाळी ७-८ मनुका पाण्यात भिजवून खा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि नैसर्गिक साखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते.

३. अक्रोड (Walnuts)

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदय बळकट करतात आणि रक्तवाहिन्या लवचीक ठेवतात.

कसे खावे: रोज दोन अक्रोड खाल्ल्याने लो बीपी, कोलेस्ट्रॉल आणि थकवा कमी होतो. तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि नर्व्हस सिस्टमही मजबूत होते.

४. खजूर (Dates)

खजूरमध्ये ग्लुकोज, आयरन, पोटॅशियम आणि फायबर असतं. हे घटक लो बीपीमुळे होणारी थकवा, चक्कर आणि सुस्ती दूर करतात.

कसे खावे: रोज २-३ खजूर दूधासोबत खा. याने शरीराला उब मिळते, ताकद वाढते आणि हृदयासोबत पचनक्रिया देखील सुधारते.

५. काजू (Cashews)

काजूमध्ये व्हिटॅमिन B6, झिंक, आयरन आणि हेल्दी फॅट्स असतात. हे रक्ताभिसरण सुधारतात आणि नर्व्हस सिस्टमला बळकट करतात.

कसे खावे: रोज ४-५ काजू खा, मात्र प्रमाणातच घ्या कारण काजूमध्ये कॅलरी जास्त असते. हे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि इम्युनिटी वाढवते.