Eating Wrong Foods Together? प्रत्येकालाच नितळ, सुंदर व तजेलदार त्वचा हवी असते. त्यासाठी आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. काही लोक स्किन केअर रूटीन फॉलो करण्यापासून ते फेसवॉश करण्यापर्यंत आपल्या स्किनची काळजी घेतात. पण, स्कीनकेअरसोबतच पौष्टिक आहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. हायड्रेशनपासून ते पोषक घटकांच्या शोषणापर्यंत, तुम्ही जे काही खाता त्यावर तुमची त्वचा कशी दिसते हे ठरते. जर तुम्हाला मुरमे, चेहऱ्यावर वारंवार मुरमे येत असतील, तर त्यामागे तुमचा आहार हा त्याचा एक मुख्य कारणीभूत घटक असू शकतो. तुम्हाला आधीच माहीत असेल की, आतड्यांच्या आरोग्याचा त्वचेवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्ही संतुलित आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्याने त्वचेच्या समस्या आणखी वाढू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण जेवताना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहीत नाही की, अनेक पदार्थ असे आहेत की, जे एकत्र खाता नयेत. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत की, जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.आतड्याच्या आरोग्याचा त्वचेवर थेट परिणाम होतो हे सर्वज्ञात असले तरी चुकीचे अन्न सेवन केल्याने त्वचेची स्थिती बिघडू शकते. आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांच्या मते, काही पदार्थांचे मिश्रण आणि विरुद्ध अन्न एकत्र खाल्ल्याने पचनावर विपरीत परिणाम होतो.

तुम्ही कोणते पदार्ख एकत्र खाणे टाळावे?

१. फळे आणि दुग्धजन्य पदार्थ- तज्ज्ञांच्या मते, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ एकत्र खाऊ नयेत. या दोन्हींचे मिश्रण केल्याने दूध पोटात गोठू शकते आणि खराब होऊ शकते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

२. फळे आणि धान्य- फळांचे सेवन भाज्यांसह एकत्र करणे टाळा. हे एकत्र खाल्ल्याने पचन मंद होऊ शकते आणि सूज येणे, अपचन आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

३. गरम केलेला मध– आपण नियमितपणे मधाचे सेवन करीत असल्यास, तो गरम करून घेणे टाळा. कारण- त्यामुळे त्याचे फायदेशीर गुणधर्म बदलू शकतात.

४. दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे यांसारखे पदार्थ हानिकारक ठरतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थही दुधासोबत खाणे हानिकारक आहे.

त्वचेसाठी कोणते पदार्थ चांगले आहेत?

तुमची त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुमच्या आहारात काही पदार्थ आणि पोषक घटकांचा समावेश करा. सल्लागार पोषणतज्ज्ञ रूपाली दत्ता तेजस्वी रंगासाठी विशिष्ट पोषक घटकांचा समावेश करण्याची शिफारस करतात.

१. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. त्यामुळे आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. प्रदूषण व तणाव यांमुळे निस्तेजपणा आणि सुरकुत्या येतात.

२. व्हिटॅमिन सी- व्हिटॅमिन सी त्वचा मजबूत आणि तरुण ठेवते. ते त्वचेचे नुकसान आणि अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करण्यासदेखील मदत करते. तुमच्या रोजच्या आहारात लिंबू, पपई, टोमॅटो व पेरू यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.

३. त्वचेच्या संरक्षणासाठी व्हिटॅमिन ई- व्हिटॅमिन ई त्वचेला सुरकुत्यांपासून दूर ठेवते. त्यासाठी आहारात बदाम, अॅव्होकॅडो, हेझलनट्स आणि सूर्यफुलाच्या बिया यांचा समावेश करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating wrong foods together experts say it could make your skin dull and acne prone srk