फेसबुक या जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनद्वारे ग्राहकांना एक नवीन सुविधा देण्यात येणार आहे. युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी कंपनी कायमच प्रयत्नशील असते. व्हॉट्सअॅपवर ज्याप्रमाणे तुम्ही एखादा मेसेज केला आणि तो तुम्हाला डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकही एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेसबुक मेसेंजरचे युजर्स आता लवकरच एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करु शकणार आहेत. मेसेज डिलीट करण्यासाठी युजरकडे 10 मिनिटांचा वेळ असेल, म्हणजे मेसेज पाठवल्याच्या 10 मिनिटांमध्येच हा मेसेज डिलीट करता येणार आहे. यासाठी मेसेंजरमध्ये अनसेंड असे एक बटण देण्यात येणार आहे. हे नवं फिचर आयओएस आणि अँड्राइडमधील काही व्हर्जनमध्ये सुरू झाले आहे. लवकरच सर्व मेसेंजरमध्ये हे फीचर उपलब्ध होणार आहे.

गेल्यावर्षी जूनमहिन्यात हे फीचर तयार केले होते. मार्क झकरबर्ग यांनी एप्रिल महिन्यात स्वत: हे फीचर वापरले होते तेव्हा हे फिचर चर्चेत आले. फेसबुकचीच मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट या अॅप्लिकेशन्ससाठीही हे फीचर उपलब्ध आहे. मेसेज अनसेंड म्हटल्यावरही एकदा कन्फर्मेशन घेतले जाणार आहे. त्यामुळे फेसबुक मेसेंजरवर व्हॉट्सअॅपप्रमाणे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook now lets you unsend messages on messenger