Natural Drink for Better Metabolism: वाढते वजन ही एक सामान्य समस्या झाली आहे. सगळे जण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या समस्येतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लोक नानाविध घरगुती उपायसुद्धा करताना दिसतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना वाढलेले वजन ही गोष्ट सातत्याने सतावत असते. वाढलेल्या वजनामुळे आजकाल अनेक जण चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते, कारण जास्त वजनामुळे शरीराला हळूहळू विविध आजार ग्रासू शकतात. आपलं स्वयंपाकघर म्हणजे अनेक आजारांवरचा उत्तम उपाय आहे. वजन कमी करण्याचे काही नुस्केही आपल्या स्वयंपाकघरातल्या विविध पदार्थांमध्ये दडून बसलेले आहेत. अशाच एका स्वयंपाकघरातील पदार्थाने वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
बडीशेप आपल्या स्वयंपाकघरातील एक सामान्य पण अत्यंत प्रभावी मसाला आहे. जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाणारी ही बडीशेप केवळ तोंडातील वास दूर करण्यासाठी नाही, तर अनेक आरोग्य समस्यांवर उपाय म्हणूनदेखील उपयुक्त आहे. विशेषतः बडीशेपचं पाणी हे पचनसंस्थेपासून वजन नियंत्रणापर्यंत अनेक फायदे देतं.
बडीशेपचं पाणी कसं करतं काम?
बडीशेपचं पाणी एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे, जे यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंड (किडनी) स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्ण यांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचं पाणी प्यायल्यास पोटाची सूज नियंत्रणात राहते. पोट फुगणं, गॅस तयार होणं, जळजळ आणि आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
उष्णतेच्या दिवसात दिलासा
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते, अशा वेळी बडीशेपचं पाणी थंडावा देतं. यामध्ये असलेले थंड गुणधर्म शरीरात थंडपणा निर्माण करतात आणि हीट स्ट्रोक किंवा डिहायड्रेशनपासून संरक्षण करतात.
पचनासाठी रामबाण उपाय
बडीशेप चयापचय सुधारते. बडीशेप बियांमध्ये ऍनेथोल, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. या बिया पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोटाशी संबंधित त्रास अपचन, फुगणं यांपासून सहज आराम मिळतो.
अँटीऑक्सिडंट्सचा भरपूर स्रोत
बडीशेपमध्ये फ्लावोनॉयड्स, फिनॉलिक कंपाउंड्स आणि व्हिटॅमिन C यांसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतात, यामुळे हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यात मदत
बडीशेपचं पाणी वजन कमी करण्यास मदत करतं. यामधील फायबर भूख नियंत्रणात ठेवतो, त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहतं.
© IE Online Media Services (P) Ltd