Durga Ashtami 2025 Wishes Messages: भारतातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला विशेष महत्व आहे. नवरात्रीचा आठवा दिवस दुर्गा अष्टमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी देवी दुर्गेने शुंभ-निशुंभ राक्षांचा वध करून भक्तांचे रक्षण केले होते. महाष्टमीचा दिवस हा महागौरी मातेला समर्पित आहे, या दिवशी तिची मनोभावे पूजा-आराधना करतात.
पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरूवात २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी होणार असून ही तिथी ३० सप्टेंबर रोजी ६ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार ३० सप्टेंबर रोजी नवरात्री अष्टमी साजरी केली जाईल. दरम्यान, यानिमित्ताने लोक एकमेकांना दुर्गाष्टमीच्या शुभेच्छा पाठवतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला आणि प्रियजनांना पाठवू शकता.
दुर्गाष्टमीच्या खास शुभेच्छा (Durga Ashtami Wishes 2025)
१) नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मताम्॥
तुम्हा सर्वांना दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
२) नवरात्रीच्या देवीचे नऊ रूप तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य देवो.
धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शक्ती मिळो.
दुर्गाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.
३) या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता…
नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः
दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…
४) जय जय जय देवी जगदंबा
तुळजा, एकवीरा तूच अंबा
आदिशक्ती तू त्रिभुवनेश्वरी
कीर्ती तुझी चराचरी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
५) उपवास करून मन करा पवित्र
आईच्या भक्तीत बदलून जाईल सर्व
श्रद्धेचं फूल वाहण्याचं हे आहे पर्व
जय अंबे जय दुर्गा
६) नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ||
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
७) ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते l l दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.