Dasara 2022 Wishes in Marathi : अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. याच दिवशी विजयादशमीही साजरी केली जाते. हा सण म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय. याच दिवशी भगवान राम यांनी रावणाचा वध करून माता सीतेला परत आणले होते, असे मानले जाते. याचाच आनंद म्हणून हा सण साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशात अगदी उत्साहात साजरा केला जातो. लोक आपले कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यासह हा सण साजरा करतात. मात्र, काही कारणांमुळे आज तुम्ही आपल्या प्रियजनांना भेटू शकत नसाल, तर खास संदेश पाठवून तुम्ही त्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसऱ्याचा हा पवित्र सण तुमच्या घरात अनंत आनंद घेऊन येवो.
भगवान राम यांच्या आशीर्वादाने तुमच्यावर सुखाचा वर्षाव होवो.
दसऱ्याच्या शुभेच्छा!

दसरा म्हणजे,
अधर्मावर धर्माचा विजय,
असत्यावर सत्याचा विजय,
वाईटावर चांगल्याचा विजय,
पापावर पुण्यचा विजय,
जुलूमशाहीवर सद्गुणाचा विजय,
क्रोधावर दया, क्षमेचा विजय,
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय,
तुम्हाला दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दसऱ्याच्या शुभदिनी केवळ रावणाच्या पुतळ्याचेच दहन नाही, तर आपल्यातील दुर्गुणांचेही दहन करूया.
रामाचे हृदयात स्मरण करून धर्ममार्गावर चालण्यास सुरुवात करूया.
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!

प्रभू श्रीरामाचे नाव हृदयात ठेवून आपल्यातील रावणाचा नाश करूया.
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy dussehra 2022 dasara vijayadashami wishes messages quotes pvp