Natural Constipation Remedies: थंडीची चाहूल लागताच आपल्या शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो आणि सगळ्यात आधी त्रास देतो तो म्हणजे पचनतंत्र. हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, शरीराची हालचाल कमी होते आणि आपण नकळतच पाण्याचं प्रमाणही कमी घेतो. या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या पोटावर होतो. दिवसातून काहीही खाल्लं की पोट फुगल्यासारखं, अंगभर जडपणा, आणि सतत बद्धकोष्ठतेची तक्रार हे सगळं अनेकांचं हिवाळ्यातील वास्तव बनतं.

बद्धकोष्ठता किंवा ज्याला इंग्रजीत Constipation कॉन्स्टिपेशन म्हणतात, बद्धकोष्ठता हा त्रास बहुतेक सर्व वयोगटांतल्या लोकांना होताना दिसून येतो. आपली जीवनशैली, आहार-विहार यांच्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमध्ये, आतड्याची हालचाल अत्यंत कमी होते, जी अनेक आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकते. जेव्हा एखादी व्यक्ती आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळेस मलत्याग करते तेव्हा त्याला बद्धकोष्ठता समस्या म्हणतात.

अशा वेळी अनेक जण औषधं घेतात, घरगुती उपाय करतात, पण काहीच फरक पडत नाही. पण आता एका हार्वर्ड प्रशिक्षित डॉक्टरांनी असा उपाय सांगितलाय की, ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. या उपायासाठी ना महागडी औषधं लागतात, ना जास्त वेळ. हा फक्त एक ‘बिया’चा जादुई फॉर्म्युला पुरेसा आहे, जो पचनतंत्राचं संतुलन परत आणतो.

डॉ. सौरभ सेठी, जे हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांमध्ये गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी सांगितलंय की, या बिया म्हणजे नैसर्गिक औषध आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणं, आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवणं आणि पोटातील फुगवट्याला आळा घालणं हे सगळं त्या याच बियांमुळे शक्य होतं.

थंडीच्या दिवसांत पाणी कमी घेतलं जातं, फळं आणि भाज्या कमी प्रमाणात खातो आणि त्याचा परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता, फुगलेलं पोट, आणि सुस्ती. पण या बिया केवळ पचन सुधारत नाहीत, तर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि गट हेल्थ (gut health) सुधारतात.

या बिया इतक्या प्रभावी कशा?

या छोट्या बियांमध्ये दडलेलं असतं एक नैसर्गिक खजिना ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर, प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन्स. या घटकांमुळे शरीरातील साखरेचं शोषण मंदावलं जातं, पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि जंक फूडची ओढ कमी होते.

हे ऐकून अनेकांना प्रश्न पडतो “शेवटी या कोणत्या बिया आहेत?”
तर डॉक्टरांच्या मते या म्हणजेच चिया बिया (Chia Seeds).

चिया बिया – पचनासाठी नैसर्गिक अमृत!

चिया बिया पाण्यात भिजवल्यावर जेलसारखा पदार्थ तयार होतो. हा जेल पोटातील ‘गुड बॅक्टेरिया’ला पोषण देतो आणि पचन तंत्राचं संतुलन राखतो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी १-२ चमचे चिया बिया पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून घ्या आणि मग दही, बदाम दूध किंवा स्मूदीसोबत सेवन करा. मात्र लक्षात ठेवा कधीही कोरड्या चिया बिया खाऊ नका.

हार्वर्ड डॉक्टरांच्या संशोधनानुसार, नियमित चिया बिया खाल्ल्याने कब्ज, ब्लोटिंग, अनियमित पचन आणि ऊर्जा कमी होणं अशा समस्या हळूहळू नाहीशा होतात.

थंडीत पचनाचा त्रास नकोय? मग आजच या छोट्या, पण जादुई चिया बियांना आपल्या आहारात सामावून घ्या