शरीराच्या निरोगी आरोग्यासाठी योग्य वेळी योग्य पदार्थ खाणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, बदलती जीवनशैली, कामाचा वाढता व्याप आणि इतर काही कारणांमुळे अनेकांच्या खाण्याच्या वेळा चुकतात. यात काही जण वेळी-अवेळी काहीही खातात त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. तर, अनेकांना सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण लवकर मिळावे, अशी इच्छा असते. पण, दुपारच्या जेवणाबाबत त्यांचा काहीच प्लॅन नसतो. अनेकदा कामाच्या गडबडीत दुपारचे जेवणच होत नाही; ज्यामुळे पोटासंबंधित अनेक विकार होतात. अशा परिस्थितीत सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये नेमके किती तासांचे अंतर असायला हवे? तसेच खाण्याच्या योग्य वेळा कोणत्या याबाबत आहारतज्ज्ञांनी योग्य माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्यतज्ज्ञ निखिल वत्स यांच्या मते, वेळी-अवेळी खाण्याच्या सवयीमुळे आरोग्याचे नुकसान होत असते. अनेकदा खूप जास्त किंवा उशिरा नाश्ता केल्याने भूक लागत नाही. अशा वेळी भूक नसेल, तर सक्तीने खाऊ नका. हेल्दी आणि बॅलन्स्ड नाश्त्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि शरीराला चार ते पाच तास ऊर्जा मिळत राहते.

नाश्त्यानंतर दुपारी किती तासांनी जेवले पाहिजे?

आहारतज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता केला असेल, तर दुपारी १ वाजेपर्यंत दुपारचे जेवण करा. पण जर तुम्ही दुपारी १ वाजता जेवत नसाल, तर लक्षात ठेवा की, सकाळी ८ वाजता नाश्ता केल्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान भूक लागल्यावर दुपारचे जेवण करा.

आहारतज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नाश्त्यामध्ये फारच कमी खाल्ले असेल किंवा अजिबात नाश्ता केला नसेल, तर तुम्हाला लवकर भूक लागते. पण, हे तुमच्या ॲक्टिव्हिटी लेव्हलवरही अवलंबून असते.

वेगवेगळ्या वेळी खाऊ नका

दुपारच्या जेवणासाठी एक वेळ ठरवून घ्या; जेणेकरून तुम्ही दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांत काही खाणार नाही. याच प्रकारे सकाळीही नाश्ता किती वाजेपर्यंत करायचा याची वेळ ठरवा. कारण- जेव्हा तुम्ही दररोज सकाळी वेळेत नाश्ता करता, तेव्हाच तुम्ही दुपारच्या जेवणाची निश्चित वेळ पाळू शकता.

दोन जेवणांत ठेवा तीन ते पाच तासांचे अंतर

दिवसभरात सतत काही ना काही खाणे टाळा. शक्य तितके लवकर दुपारचे जेवण करा. अनेक संशोधनांनुसार, जेवणाची वारंवारता वजन कमी होणे, हृदयाचे आरोग्य व मधुमेहाशी संबंधित आहे. सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणात किमान तीन ते पाच तासांचे अंतर ठेवा. त्यामुळे शरीराला पचनासाठी पूर्ण वेळ मिळतो.

दुपारी न जेवल्यास काय होईल?

संशोधनानुसार, जे लोक दिवसभरात कमी किंवा अजिबातच काही न खाता रात्रीच्या जेवणात सर्व अन्न खाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच दुपारचे जेवण करणे टाळू नका. कारण- या कारणामुळे वजन वाढते; शिवाय आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्याही उदभवू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips what is the gap betwwen breakfast and lunch minimum timings difference between two meals