Male Breast Cancer Signs: ब्रेस्ट कॅन्सर हा आजार साधारणपणे महिलांमध्ये आढळतो. असाच समज आतापर्यंत लोकांमध्ये होता. मात्र, एका अहवालानुसार पुरूषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असल्याचे दिसून आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने आतापर्यंत ९१ पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची खात्री केली आहे. हा आकडा २०२४ सालचा आहे. ही संख्या २०१८ मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांच्या सह पट जास्त आहे. तज्ज्ञांचं यावर म्हणणं आहे की, ही चिंताजनक बाब आहे, कारण पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. साधारणपणे दर १ लाख पुरूषांमध्ये फक्त एकच पुरूष या आजाराने ग्रस्त आहे. मात्र पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं नेमकं कारण काय याबाबत सविस्तर माहिती घेऊ…
पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणं?
तज्ज्ञांच्या मते, ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त महिलांचा आजार नाही. प्रत्येकजण जन्मत:च काही प्रमाणात स्तनाच्या ऊतींसह जन्माला येतो आण ही ऊती कधीकधी असामान्यपणे वाढू शकते. मेयो क्लिनिकच्या मते, पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर स्तनाच्या ऊतींच्या पेशींमध्ये बदलांसह सुरू होतो. या कॅन्सरच्या पेशी हळूहळू वाढतात आणि कालांतराने गाठ किंवा ट्यूमरमध्ये विकसित होतात.
कोणत्या पुरूषांना जास्त धोका असतो?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती ६० ते ७० वयोगटातील पुरूषांमध्ये सर्वात जास्त दिसून येते. मात्र ती कोणत्याही वयात होऊ शकते. सीडीसी आणि मेयो क्लिनिकच्या मते, अशी परिस्थिती विकसित होण्याचा धोका वाढवणारे अनेक घटक आहेत. यामध्ये वाढते वय, हार्मोनल असंतुलन किंवा इस्ट्रोजेन थेरपी, ब्रेस्ट कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ज्यामध्ये पुरूषांमध्ये एक्स क्रोमोसोम अतिरिक्त असतात, सिरोयसिससारखे लिव्हरचे आजार, लठ्ठपणा, ज्यामुळे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते आण टेस्टिक्युलर रोग किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
दुर्लक्ष करू नये अशी लक्षणे
तज्ज्ञांच्या मते, पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे बहुतेकदा सौम्य असतात आणि बहुतेकदा दुर्लक्षित केली जातात. काही सामान्य लक्षणांमध्ये छातीवर वेदनारहित गाठ किंवा सूज येणे, त्वचेवर फोड्या येणे, लालसरपणा किंवा रंग बदल, स्तनाग्राच्या आकारात बद किंवा आतल्या बाजूस वळणे, स्तनाग्रातून द्रव किंवा रक्त गळण आणि काखेत किंवा कॉलरबोन भोवती सूज येणे यांचा समावेश आहे. जर यापैकी कोणतीही लक्षणे जास्त काळासाठी टिकून राहिली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
यावर उपाय काय?
हा आजार पूर्णपणे रोखणे शक्य नाही, मात्र काही खबरदारी घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असेल तर अनुवांशिक चाचणी केली पाहिजे. याव्यतिरिक्त वजन नियंत्रणात ठेवणे, मद्यपान मर्यादित करण आणि नियमित आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
