Weight loss tips: वजन कमी करणे हे जितके आव्हानात्मक वाटते अगदी तसेच आहे. फक्त कमी खाऊन किंवा जास्तीत जास्त हालचाल करून वजन कमी होत नाही. अनेकजण वर्षानुवर्षे आहार, व्यायाम आणि काही लगेच रिझल्ट देणारे उपाय करून पाहतात. मात्र, योग्य परिणाम दिसले नाही की निराशा, थकवा आणि कधीकधी वजन वाढते. तुम्हीसुद्धा वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर फिटनेस आणि आहारतज्ज्ञ लियाम टोफॅम वजन कमी करणाऱ्या व्यावसायिकांकडून होणाऱ्या काही चुका तुमच्या लक्षात आणून देत आहेत, त्या जाणून घेऊ…
फिटनेस आणि आहारतज्ज्ञ लियाम टोफॅम यांच्या मते, वजन कमी करण्याचा प्रवास हा लगेचच परिणाम मिळवण्यापेक्षा संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य नियोजनावर अवलंबून असतो. फिटनेस प्रशिक्षक लियाम टोफॅम हे त्यांच्या अनुभवावरून सांगतात की, या सामान्य चुका टाळल्याने केवळ वजन कमी होणार नाही, तर तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यदेखील सुधारेल.
नाश्ता वगळणे
कॅलरीज कमी करण्यासाठी अनेकजण नाश्ता वगळतात. याबाबत संशोधनातून असे समोर आले की, यामुळे वजन कमी होण्यास अजिबातच मदत होत नाही. प्रथिने आणि फायबरयुक्त नाश्ता रक्तातील साखर स्थिर कऱण्यास, भूक नियंत्रित करण्यास आणि स्नायूंच्या वाढीस मदत करण्यास मदत करतो. अभ्यासातून असेही दिसून आले की, जे लोक नियमितपणे नाश्ता करतात त्यांना नाश्ता वगळणाऱ्यांपेक्षा लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी असते.
कमी कॅलरीज किंवा अत्यंत कमी कार्बोहायड्रेट्स असलेला आहार
जलद परिणाम मिळवण्यासाठी अनेक जण अत्यंत कमी कॅलरी किंवा क्रॅश डाएट, केटो डाएट अशा पद्धतींचा अवलंब करतात. लियमा यांनीही असेच केले होते. मात्र थकवा, स्नायूंची ताकद कमी होणे आणि चयापचय मंदावणे असा त्याचा परिणाम झाला. त्यामुळे वजन वाढणे सोपे झाले. संशोधनातून असेही समोर आले की, खूप कमी कॅलरीयुक्त आहारामुळे चयापचय मंदावतो आणि त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होते.
पटापट जेवणे आणि पोट गच्च भरेपर्यंत खाणे
खूप पटापट खाल्ल्याने मेंदूला पोट भरल्याचा सिग्नल उशीरा मिळतो. त्यामुळे जास्त खाणे होते. म्हणूनच प्रत्येक घास पूर्णपणे चावणे आणि वारंवार थांबणे महत्त्वाचे आहे. यामुळे पोट भरल्याचे सुनिश्चित होते आणि अति खाण्यावर रोख लागते.
निरोगी लेबल्स असलेले बार
प्रोटीन बार, तृणधान्ये किंवा मील रिप्लेसमेंट पॅकेट्स सोयीसक्र तर असतात, मात्र यामध्ये अनेकदा हाय कॅलरी आणि प्रोसेस्ड शुगर अशते. फळं, दही, अंडी आणि संपूर्ण अन्न हे रोजच्या आहारासाठी उत्तम पर्याय आहेत. प्रोटीन बार वगैरे हे केवळ गरजेच्या वेळी किंवा प्रवासादरम्यान वापरावेत.
नियोजनाचा अभाव आणि बाहेरचं अन्न
नियोजन न करता पूर्ण दिवस बाहेर घालवायचा असेल तर अनेकदा लोक बाहेरच्या जंक फूडवर अवलंबून असतात. रिसर्चनुसार, अन्नाचे नियोजन, तयारी आणि बॅच कुकींग करणाऱ्या लोकांच्या डाएटची गुणवत्ता अधिक चांगली असते आणि त्यांना लठ्ठपणाचा धोकाही कमी असतो.
किचनमध्ये जंक फूडचा स्टॉक ठेवणं
घरात डोळ्यांसमोर जर कोल्ड ड्रिंक, चिप्स किंवा गोड पदार्थ असतील तर ते खाल्ले जाणं जवळपास निश्चित आहे. रिसर्चनुसार, घरात बनवलेल्या आणि उपलब्ध असलेल्या खाण्याचा थेट परिणाम आपल्या डाएटवर होतो. अशावेळी जंक फूड हटवून फळे, नट्स आणि हेल्दी स्नॅक्सचा पर्याय स्वीकारा.
फक्त वर्कआउटवर अवलंबून राहणं
अनेकजण विचार करतात की तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी होईल, मात्र चुकीच्या डाएटसोबत वर्कआउटचा परिणाम मोजकेच असतात. वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम याचा समन्वय राखणं गरजेचं आहे.
झोप आणि रिकव्हरीकडे दुर्लक्ष करणे
वजन कमी करण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप गरजेची असते. अपुऱ्या झोपेमुळे भूकेला चालना देणारे हार्मोन्स वाढतात आणि मेटाबॉलिज्म मंदावते.