Pregnancy Tips : जेव्हा एखाद्याला खोकला होतो, तेव्हा त्या व्यक्तीला विविध आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणजेच डोकेदुखी, अंग दुखणं अशाप्रकारच्या आजारांतून बरे होण्यासाठी आपण नेहमी क्रोसिन, पॅरासिटोमोल, डोला, सुमो, कालपोलचा वापर करतो. पण गरोदरपणातही या औषधांचा वापर करू शकतो का? यामुळे बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो का? गरोदरपणात डॉक्टरांना विचारल्याशिवाय काही महिला औषधे खात नाही. पण काही अशा महिला आहेत, ज्या कोणताही विचार न करता बिंधास्तपणे पॅरासिटोमोल खात असतात. गरोदरपणाता पॅरासिटोमोल खाणं योग्य असतं का? याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरासिटोमोल खाल्ल्याने बाळाच्या शरीरावर काय परिणाम होतो?

रिसर्चनुसार, गरोदरपणात पॅरासिटोमोल खाऊ नये. कारण याच्या सेवनामुळे प्लेसेंटाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. याचा थेट परिणाम बाळाच्या वाढीवर होतो आणि बाळाचं लिव्हरही खराब होऊ शकतं. पॅरासिटोमोल खाल्ल्याने मुलांचं रिप्रोडक्टिव आणि यूरोजेनायटल डिसॉर्डरचं धोकाही वाढतो. या आजारामुळे बाळाला लघवी करताना अडथळा निर्माण होतो.

नक्की वाचा – रात्री जेवल्यानंतर चालण्याची योग्य पद्धत कोणती? जेवणानंतर ३० मिनिटं थांबवं की नाही? जाणून घ्या सविस्तर

बाळाची ‘आयक्यू’ कमी होते

एनसीबीआयच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, गरोदरपणात पॅरासिटोमोल खाल्ल्याने बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. गरोदरपणात पॅरासिटोमोलचं सेवन केलं पाहिजे किंवा नाही, याबाबत आतापर्यंत अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. डेली मेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गरोदरपणात खूप जास्त पॅरासिटोमोल खाल्ल्याने बाळाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. बाळाला अटेंसन डेफीसिट हायपरएक्टिविटी डिसॉर्डर, ऑटिज्म, लॅंग्वेज आणि आयक्यूची समस्या उद्धवू शकते.

Disclaimer : या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी अमलात आणण्याआधी डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the side effects of paracetamol uses in pregnancy know the caution of paracetamol nss