Sweets for diabetic patients in Diwali: दिवाळी हा दिव्यांचा, उत्सवाचा आणि अर्थातच मिठाईचा सण. ताज्या मिठाईचा सुगंध, दिव्यांचा झगमगाट आणि एकत्र मजा करण्याचा आनंद हा सण आणखी खास बनवतो. असं असताना रक्तातील साखरेची पातळी अर्थात ब्लडशुगर नियंत्रित करणाऱ्यांसाठी पारंपरिक मिठाई ही एक मोठं आव्हान ठरू शकते. कारण यामध्ये रिफाइंड साखर, तूप आणि भरपूर कॅलरीज असतात. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला सणाची मेजवानी वगळणं गरजेचं नाही. गूळ, खजूर किंवा स्टीव्हियासारखे नैसर्गिक गोड घटक वापरून तसंच अनेक फायबरयुक्त पदार्थांचा वापर करून मिठाई तयार केली जाऊ शकते. तुम्ही हृदयाला निरोगी ठेवणाऱ्या तेलात स्वयंपाक करून, रक्तातील साखरेवर सौम्य अशा चविष्ट मिठाई तयार करू शकता.
दिवाळीत आरोग्याशी तडजोड न करता तुम्ही चविष्ट मिठाईचा आस्वाद घेऊ शकता.
डायबिटीज रूग्णांसाठी गोड पदार्थ करण्यासाठी काय करावे?
1.नैसर्गिक गोड पदार्थ
रिफाइंड साखरेऐवजी गूळ, खजूर किंवा स्टीव्हिया वापरा. या पर्यायांचा कमी ग्लायसेमिक प्रभाव असतो आणि ते अतिरिक्त पोषक तत्वे देतात. जर्नल न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, स्टीव्हिया आधारित टेबलटॉप गोड पदार्थ तीन महिन्यांच्या ग्लायसेमिक नियंत्रणात लक्षणीय बदल घडवून आणत नाहीत.
2. फायबरयुक्त घटक
ओट्स, संपूर्ण गव्हाचे पीठ आणि बेसन अशी धान्ये, काजू आणि बियांसह साखरेचे शोषण कमी करतात आणि तृप्तता देतात.
3. योग्य तेल
तूप किंवा हायड्रोजनेटेड फॅट्सपेक्षा असंतृप्त चरबी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले तेल चयापचय संतुलन राखण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात.
4. साखरेवर नियंत्रण ठेवणारे तेल
साखरेचे नियमन करण्यास मदत करणारे तेल निवडल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि त्याचबरोबर सणाच्या गोडधोड पदार्थांचा आनंद घेता येतो. बीएमसी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ऑलिव्ह ऑइलचे सेवन मधुमेहाचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे. दररोज १० ते २० ग्रॅम ऑलिव्ह ऑइल प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरू शकते.
डायबिटीज रूग्णांसाठी खास पाककृती
कमी साखरेचे ड्रायफ्रूट आणि नट्स लाडू
बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड यांचे मिश्रण थोड्या प्रमाणात हृदयासाठी फायदेशीर स्वयंपाकाच्या तेलात हलके भाजून घ्या. भाजल्याने त्याला कुकरीतपणा येतो. थंड झाल्यावर त्यात खजूर किंवा खजूराची पेस्ट मिक्स करा. तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. मात्र, साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा वापरही कमीच करा. मिश्रण एकत्र केल्यावर लहान लहान आकाराचे लाडू बनवा. या लाडूंमुळे फायबर, प्रथिने आणि निरोगी चबीने परिपूर्ण असतात.
भाजलेला नारळ आणि गुळाची बर्फी
ताजा नारळ किसून त्यात गूळ किंवा साखरेचा पर्यायी पदार्थ मिक्स करा. नारळदेखील थोड्याशा तेलात हलका भाजून घ्या. तळण्याऐवजी मिश्रण ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये पसरवा आणि सेट होईपर्यंत बेक करा. बेकिंगमुळे तेलाचे प्रमाण कमी होते आणि बर्फीची पारंपरिक चव टिकून राहते.
ओट्स आणि बेसन लाडू
उच्च फायबर बेसाठी ओट्स आणि बेसन एकत्र करा. दोन्ही घटक थोड्याशा तेलात तपकिरी आणि सुगंधी होईपर्यंत भाजून घ्या. मिश्रण गोड करण्यासाठी खजूर किंवा कमीत कमी गूळ घाला. मिश्रण गरम असतानाच त्याचे लहान गोळे करा. हे लाडू पोटभरीचे, पचनास हलके आणि ऊर्जा देणारे असतात.
भाजलेली करंजी
पारंपरिक करंजीला पर्याय म्हणून तुम्ही भाजलेली करंजी ट्राय करू शकता. भाजलेले काजू, बिया, नारळ किंवा खव्याचा पर्याय वापरू शकता. फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि साखरेचे शोषण कमी करण्यासाठी बाहेरील आवरणासाठी गव्हाचे पीठ वापरा. करंजांमध्ये सारण भरून त्या बेक करण्याआधी थोडंस ब्रशने तेल त्यावर लावा. डिप फ्राय न केल्याने तेलाचावापर कमी होतो आणि मिठाईला सोनेरी, कुरकुरीत पोत मिळते.
गव्हाची काजू कतली
प्रथिने आणि फायबरसाठी गव्हाच्या पीठात थोडंसं हरभऱ्याचं पीठ मिसळा. जास्त साखर न घालता पारंपरिक चव टिकवून ठेवण्यासाठी साखरेचा पर्याय किंवा थोड्या प्रमाणात गूळ वापरून मिश्रण गोड करा. मिश्रण बांधण्यासाठी कमीत कमी तेल वापरा आणि ट्रे हलकासा ग्रीस करा. मिश्रणाचे पातळ डायमंड शेपचे तुकडे करा.