How to Remove tanning त्वचा काळवंडण्याची अनेक कारणे असतील पण याकडे थोडे लक्ष दिले तर ही समस्या दूर होऊ शकते. उन्हाळ्यात बहुतेक लोकांचे हात-पाय काळे होऊ लागतात, हे टाळण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. जर तुम्हालाही टॅनिंगचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे काळे हात पाय गोरे करू शकता. त्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करुन तुम्ही हात-पायाची त्वचा उजळवू शकता, चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काळेपणा दूर करा

उन्हाळ्यात हात-पाय काळे होणे ही एक सामान्य समस्या आहे. हे टाळण्यासाठी उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. जर तुम्ही सतत उन्हात असाल तर दर २ तासांनी सनस्क्रीन वापरा. यामुळे तुमच्या त्वचेवरील काळेपणा दूर होईल आणि तुमची त्वचा चमकदार होईल. दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा आणि हात पाय थंड पाण्याने धुवा. यामुळे शरीरातील धूळ, माती आणि घाण निघून जाईल.

या गोष्टी वापरा

याशिवाय कोरफड जेल, दही, लिंबाचा रस, बेसन आणि हळद या नैसर्गिक घटकांचा वापर करा. या गोष्टी मिक्स करून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा, त्यानंतर चेहरा धुवा. याशिवाय तुम्ही त्यांचा फेस पॅक किंवा स्क्रब म्हणून वापर करू शकता. काही लोकांना या गोष्टी वापरून ऍलर्जी होऊ शकते. तुम्हाला याबाबत काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

उन्हात बाहेर जाताना गडद रंगाचे कपडे घालू नका. त्याऐवजी हलक्या रंगाचे आणि सैल सुती कपडे घाला. याशिवाय तुमचा चेहरा आणि अंग उन्हापासून वाचवण्यासाठी तुम्ही टोपी आणि सनग्लासेस लावू शकता. लक्षात ठेवा की तुम्हाला दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे लागेल, यामुळे त्वचा हायड्रेट राहील. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा, कारण ते टॅनिंग वाढवते. या सर्व गोष्टी करूनही जर तुमच्या हात-पायातील काळेपणा दूर होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून पेस्ट बनवा. त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा. त्वचा उजळण्यास मदत होईल.

हेही वाचा >> Weightloss Exercise: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी करावा की संध्याकाळी? घ्या जाणून…

संत्र्याच्या साली वाटून पावडर करा. त्या पावडरमध्ये दही घाला आणि पेस्ट हाता-पायाला लावा. फायदा होईल. टॉमेटोमध्ये लायकोपेन नावाचे अॅंटीऑक्सीडेंट असते. ते ब्लीचचे काम करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेचा रंग उजळतो. त्यासाठी टॉमेटो त्वचेवर रगडा. असे नियमित केल्याने हाता-पायाच्या त्वचेवर चमक येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies for tanned skin of hands and legs home remedies for tanned feet srk