Best Vegetables for Uric Acid Control: आजकाल अनेक लोकांना Uric Acid ची समस्या सतावत आहे. जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर टेस्ट करायला सांगतात आणि टेस्टमध्ये युरिक अ‍ॅसिड जास्त असल्याचे दिसून येतं.  आजकाल बदलत्या जीवनशैलीसोबतच खाण्यापिण्याच्या सवयीमुळे युरिक ॲसिडचं प्रमाण वाढण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. शरीरात वाढणाऱ्या युरिक ॲसिडमुळे अनेक जण खूप त्रस्त आहेत; तर युरिक ॲसिड हा रक्तात तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे, जो प्युरिन नावाच्या केमिकल विघटनामुळे तयार होतो. 

या त्रासावर तुमच्या घरच्या फ्रिजमध्येच तुम्हाला औषध सापडेल यावर विश्वास बसतोय का? हजारो रुपये खर्च करून इलाज शोधण्यापेक्षा रोजच्या जेवणातल्या भाज्यांमध्ये शरीराला तारणारा घटक दडलेला आहे. ‘हाय युरिक अॅसिड’ म्हणजेच रक्तात वाढलेलं आम्ल शरीराला आतून पोखरतं. त्यामुळे सांध्यांमध्ये आग पेटल्यासारखा त्रास होतो. उपचार घेतले नाहीत, तर गाऊटसारख्या वेदनादायक आजाराचा धोका दार ठोठावत उभा राहतो. पण खरी गंमत ही की, यावरील उपचाराचं गुपित लपलंय अगदी तुमच्या किचनमध्ये! चला जाणून घेऊया त्या सहा चमत्कारी भाज्या, ज्या शरीरातील वाढलेलं युरिक अॅसिड वितळवून टाकतात, जणू मेण वितळतं तसं…

१. काकडी

थंडगार काकडी म्हणजे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स. पाण्याचं मोठं प्रमाण आणि कमी प्युरिन्स यांमुळे शरीरातील विषारी घटक लघवीतून बाहेर पडतात. काकडीतील अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे घटक सांध्यांचा त्रासही दूर करतात.

२. टोमॅटो

लालेलाल टोमॅटो पदार्थाची फक्त चवच वाढवत नाहीत, तर ते एक ‘औषध’ही आहे. क जीवनसत्त्व आणि लायकोपीन यांमुळे शरीरातील सूज कमी होते. टोमॅटोचा अल्कलायझिंग प्रभाव किडनीला बळकटी देतो.

३. कारले

कडवट चवीमुळे कारलं कित्येकांना नकोसं वाटतं; पण ते शरीरासाठी मात्र अमृत! कारल्याच्या रसाचा एक ग्लास शरीरातील युरिक अॅसिडचं प्रमाण लवकर खाली आणतो. त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम व क जीवनसत्त्व हे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक उपचारक घटक आहेत.

४. गाजर

गाजरातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक शरीरातील युरिक अॅसिड बाहेर फेकतात. कच्च्या गाजराच्या सेवनामुळे किडनीवरचा ताण कमी होतो आणि रक्त शुद्ध होतं.

५. पालक

‘हेल्दी’ म्हणत आपण खातो तो पालकसुद्धा युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतो; पण ते मर्यादेत प्रमाणातच खायला हवं. कारण- यात प्युरिन्स आहेत. योग्य प्रमाणात खाल्लं, तर ते औषधच ठरतं.

६. ढोबळी मिरची

लाल, पिवळी, हिरवी अशा रंगांमध्ये उपलब्ध असलेली ढोबळी मिरची म्हणजे शरीराचा खरा रक्षक. कमी प्युरिन्स, भरपूर क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स यांमुळे सांध्यांना आराम मिळतो. गाऊटचे अटॅक टाळण्यासाठी ढोबळी मिरची एकदम उपयुक्त.

महागड्या औषधांचा स्वत:वर मारा करून न घेता, रोजच्या थाळीत या भाज्यांचा समावेश करा. तुमच्या किचनमधल्या साध्या पण गुणकारी भाज्या शरीराला केवळ ताकदच देत नाहीत, तर ‘युरिक अॅसिड’सारख्या गंभीर समस्येवर नैसर्गिक उपाय ठरतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)