Cleaning Tips : घरातील दरवाजे आणि खिडक्यांवर पडदे असणे ही सामान्य बाब आहे. बहुतेक लोक फक्त दिवाळीच्या सुमारास किंवा काही खास प्रसंगांसाठीच पडद्यांची धुलाई करतात. मात्र, पडदे फक्त घराच्या सौंदर्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही महत्त्वाचे असतात. तुम्हाला माहीत आहे का, घान पडदे, पायदान व चादर यांमुळे घरातील हवेत धूळ आणि जंतू जमा होतात आणि त्वचेसाठी ते हानिकारक ठरू शकतात. हे विशेषतः लहान मुले, वृद्ध किंवा श्वसनाच्या समस्यांमध्ये असणाऱ्यांसाठी अधिक जोखमीचे असते. त्यामुळे वेळोवेळी पडदे स्वच्छ ठेवणे आणि त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

घरातील जड आणि घान झालेले पडदे अनेक लोक मशीनमध्ये धुतात; तर काही जण त्यांना ड्राय क्लीनिंगवर सोडतात. परंतु, प्रत्येक घरात मशीन किंवा ड्राय क्लिनिंगची सोय नसते. थोड्या काळजीने, योग्य मार्गदर्शन आणि साध्या उपायांनी तुम्ही घरच्या पडद्यांना सहजतेने स्वच्छ करू शकता. त्यामुळे वेळ, पैसा वाचतो आणि पडदे दीर्घकाळ टिकतात. नियमित स्वच्छतेमुळे पडद्यांवर धूळ, डाग आणि जंतू जमण्याचे प्रमाण कमी होते. तसेच घरातील हवा अधिक ताजी आणि शुद्ध राहते.

१. पडद्यावर जमलेली धूळ काढा

सगळ्यात पहिल्यांदा पडद्यांवर जमा झालेली धूळ झटकून किंवा झाडून काढा. पडदे खाली उतरवून चांगले झटकावेत. जर जास्त धूळ असेल, तर काठीचा किंवा झाडूचा हलकासा वापर करून धूळ दूर करा. घरात व्हॅक्यूम क्लीनर असल्यास त्याचा उपयोग करा; पडदे नीट पसरवून व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करा. ही पद्धत पटकन साह्यभूत अशी आणि प्रभावी आहे.

२. स्टीम क्लिनिंग करा

जर तुम्हाला पडदे न धुताच साफ करायचे असतील, तर स्टीम क्लिनिंग हा एक उत्तम उपाय आहे. आधी जितकी शक्य असेल धूळ काढा आणि नंतर स्टीमरचा उपयोग करून पडदे स्वच्छ करा. पडद्यांवर जिद्दी डाग असल्यास स्टीमरमध्ये थोडे व्हाईट व्हिनेगर वापरू शकता. त्यामुळे डाग हळूहळू हलके होण्यास मदत मिळेल.

३. व्हिनेगरच्या साह्याने जिद्दी डाग हटवा

घरात लहान मुले असतील, तर पडद्यांवर विविध प्रकारचे डाग दिसणे स्वाभाविक आहे. हे डाग हटवण्यासाठी व्हिनेगर अत्यंत उपयुक्त आहे. पडदे वॉशिंग मशीनमध्ये ठेवा. त्यात थोडे व्हाईट व्हिनेगर आणि हलकीशी सामान्य डिटर्जंट पावडर टाका. मशीन चालू केल्यास पडदे स्वच्छ होऊन नवीनसारखे चमकू लागतात.

४. नियमित काळजी महत्त्वाची

पडद्यांची नियमित स्वच्छता केल्याने फक्त पडदेच नव्हे, तर घरातील हवा ही ताजी राहते. तसेच धूळ, जंतू आणि इतर प्रदूषण कमी होते, जे आरोग्यास फायदेशीर आहे. त्यामुळे फक्त दिवाळी किंवा विशेष प्रसंगाची वाट पाहू नका, महिन्यातून एकदा पडदे झटकणे, धूळ साफ करणे आणि गरज असल्यास स्टीम क्लिनिंग करणे गरजेचे आहे.

५. घरच्या मशीन आणि स्टीमरचा वापर

पडदे घरच्या मशीनमध्ये किंवा स्टीमरमध्ये स्वच्छ करताना नेहमी पडद्याच्या लेबलवरील सूचना पाहा. काही पडदे फक्त ड्राय क्लिनिंगसाठी असतात, तर काही मशीनमध्ये धुतले जाऊ शकतात. त्यामुळे पडद्यांचा टिकाऊपणा आणि चमक कायम राहते.