Natural ways to wash hair without shampoo: खरं तर रोज केसांना शांपू करणं योग्य नाही; पण कधी कधी केसांमध्ये इतका मळ आणि चिकटपणा निर्माण होतो की, केस न धुता बाहेर जाणं शक्यच होत नाही. अशा वेळी तुमचं आवडतं स्किनकेअर प्रोडक्ट – मायसेलर वॉटर – तुमच्या या अडचणीवर उत्तर ठरू शकतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायसेलर वॉटर हे सौम्य क्लीन्सर आहे, जे मायसेल्स नावाच्या लहान रेणूंच्या गटांपासून बनवलं जातं. हे मायसेल्स तेलाला चिकटतात आणि त्यामुळे त्वचेवरील मेकअप व घाण सहज साफ होते. त्याचबरोबर त्वचा ओलसरही राहते. हे मायसेलर वॉटर चेहरा धुण्याशिवाय किंवा घासल्याशिवाय त्वचा स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय आहे.

पण, हे स्किन क्लीन्सर ड्राय शांपूसारखे कसे वापरता येईल? जसं ते चेहरा स्वच्छ करतं, तसेच त्यात असलेले मायसेल्स केसांमधली घाण आणि तेल शोषून घेतात; पण केसांमधलं नैसर्गिक तेल काढून टाकत नाहीत. हे टाळू आणि केस ताजेतवाने ठेवायला मदत करतं आणि कुठलाही चिकटपणा किंवा थर शिल्लक ठेवत नाही.

“हा केस स्वच्छ करण्याचा एक सौम्य आणि प्रभावी उपाय आहे, विशेषतः ज्यांची टाळू संवेदनशील आहे किंवा जे पर्यावरणपूरक पर्याय शोधत आहेत त्यांच्यासाठी. जरी हा उपाय पारंपरिक शांपूला पूर्णपणे बदलू शकत नसला तरी हा केसांच्या देखभालीच्या दिनक्रमामध्ये एक उपयुक्त जोड ठरू शकतो,” असं डॉ. सोनाली कोहली यांनी (सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई) स्पष्ट केलं.

कसं वापरायचं?

“मायसेलर वॉटर ड्राय शांपू म्हणून वापरायचं असल्यास, ते कॉटन पॅडवर घेऊन टाळूवरच्या तेलकट भागांवर हलकं हलकं लावावं. हा उपाय जास्त तेल शोषून घेण्यास मदत करतो आणि केस स्वच्छ व हलके वाटू लागतात,” असं डॉ. कोहली म्हणाल्या.

पण, हे लक्षात ठेवायला हवं की, मायसेलर वॉटर केस थोडेफार साफ करण्यासाठी छान आहे. मात्र फार जड तेल किंवा जास्त मळ साफ करण्यात ते तितकं प्रभावी नसू शकतं.

मायसेलर वॉटर ड्राय शांपू म्हणून वापरण्याचे फायदे काय आहेत?

डॉ. कोहली यांनी केसांसाठी मायसेलर वॉटरचे खालील फायदे सांगितले:

  • जेंटल क्लिन्जिंग: मायसेलर वॉटरमध्ये माईल्ड साफ करणारे घटक असतात, त्यामुळे हे संवेदनशील टाळूसाठी योग्य आहेत. हे केसांवर जमा झालेला प्रेडक्टचा थर साफ करतं आणि केस ताजे ठेवतं.
  • कोरडेपणा न आणणारे (Non Dehydrating) : काही पारंपरिक शांपूप्रमाणे हे केसांतील नैसर्गिक तेल काढून टाकत नाही. त्यामुळे केस ओलसर आणि मॅनेजेबल राहतात.
  • सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य: हे पातळ, तेलकट किंवा कुरळ्या केसांवर वापरता येतं. केसांना वॉल्युम देतं आणि जास्त तेल काढून टाकतं.
  • पर्यावरणपूरक: पारंपरिक शांपूच्या तुलनेत मायसेलर वॉटर कमी पाण्यात वापरता येतं, त्यामुळे ते अधिक टिकाऊ पर्याय आहे.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to clean hair without shampoo hair washing home made tips dvr