How to get rid of ‘deemak’ from wooden furniture: हल्ली घरोघरी फर्निचरच्या वेगवेगळ्या वस्तू असतातच. वॉर्डरोब, बेड, खुर्च्या, टेबल अशा वस्तू तर जवळपास सगळीकडेच दिसतात. काही घरांमध्ये खूप जास्त फर्निचर असतं. अगदी भिंतींनासुद्धा प्लायवूड लावलेलं असतं. पण जर फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणं झालं नाही आणि त्याच्यात पाणी मुरायला लागलं तर काही दिवसांतच त्याला किडा लागतो. यालाच आपण वाळवी लागणं असं म्हणतो. एकदा फर्निचरला वाळवी लागली आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवसांतच वाळवीचा किडा फर्निचरचा पार फडशा पाडतो आणि सगळ्या लाकडी वस्तू आतून पोकळ करून टाकतो. वाळवीपासून मुक्त होण्यासाठी बाजारात अनेक केमिकल्स आणि पेस्ट कंट्रोल सेवाही उपलब्ध आहेत, पण घरगुती उपाय कमी खर्चिक, सुरक्षित आणि सोपे असतात. जर तुमच्या घरात वाळवीची दहशत वाढली असेल, तर खालील उपाय नक्की करून पाहा.
तुरटीचे पाणी
तुरटीच्या मदतीने तुम्ही वाळवीपासून सहज सुटका मिळवू शकता. यासाठी, अर्धा लिटर पाण्यात सुमारे ५००-६०० ग्रॅम पावडर विरघळवा. आता हे द्रावण एका स्प्रे बाटलीत ओता आणि वाळवीने ग्रस्त असलेल्या भागावर फवारणी करा. तुरटीच्या तीव्र वासामुळे वाळवी मरतील.
कडुलिंबाच्या तेल
वाळवीला रोखण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे कडुलिंबाच्या तेल. नीम ऑईल म्हणून ते ओळखलं जातं. ज्याठिकाणी वाळवी जास्त प्रमाणात दिसते आहे त्या ठिकाणी हे तेल शिंपडा.त्याच्या उग्र वासाने आणि त्याच्यातील ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मांमुळे वाळवीचं प्रमाण कमी होतं.
सूर्यप्रकाशचा वापर
वाळवी काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वाळवीने प्रादुर्भाव झालेली वस्तू उन्हात ठेवणे.४ तास उन्हात ठेवल्याने वाळवी काढली जाते.
मीठ
मीठ हे कीटकनाशक आहे. मीठ शिंपडल्याने वाळवी मरण्यास फायदा होतो. कापूस मिठाच्या द्रावणात भिजवून दिक खातात अशा ठिकाणी ठेवल्यास त्याचा नाश होतो.हा साधा सोपा उपाय करण्यासाठी तुम्ही एक कप पाणी गरम करा आणि त्यात एक कप मीठ घाला. आता हे द्रावण सिरिंजमध्ये इंजेक्ट करा आणि वाळवी प्रभावित भागात भरा. दीमक अदृश्य होण्यास सुरवात होईल.ज्या ठिकाणी वाळवी आढळते त्या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकल्याने देखील वाळवी मरते. या साध्या घरगुती उपायांनी तुम्हाला देखील फायदा होईल. हा उपाय करण्यासाठी फार पैसे देखील लागणार नाही.