Beauty treatments for hands: स्वत:च्या चेहेऱ्यावरुन हात फिरवताना आपल्याला आपलाच स्पर्श नकोसा वाटतो आहे का? खरंतर हे असं अनेकजणींच्या बाबतीत नेहेमीच होतं तर काहीजणींच्या बाबतीत गेल्या वर्षापासून घडत आहे. सतत हात सॅनिटाइझ करुन , वारंवार हॅण्डवॉशनं हात धुवावे लागत असल्यानं अनेकींचे हात सध्या रखरखीत, खडबडीत आणि कोरडे झाले आहेत. ही समस्या बहुतेक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. वातावरण, अंगातील उष्णता, सतत भांडी घासून, कपडे धुवून , भाज्या चिरुन हातातला मऊपणा हरवल्याची तक्रार अनेकींची असते. हा हाताचा खडबडीतपणा कमी करण्याचे अगदी सोपे उपाय आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदाम तेल, बटाट्याचा रस

तुमच्या हाताची त्वचा खरखरीत असेल तर गरम पाण्यात हात ठेवा आणि हात सुकवून त्यावर बदाम तेल लावा. तसेच हातावर जास्त रेषा असतील तर बटाट्याचा रस हातावर घासा. खरखरीत हात मऊ करण्यासाठी एक मोठा चमचा दही, त्यात एक छोटा चमचा बदाम पावडर घालून त्याचे मित्रण हाताला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने हात धुवून टाका.

कोरफड

कोरफडीत पॉलिसॅचराइडस हा घटक असतो. त्यामूळे त्वचा आर्द्र राहाते आणि मऊ होते. हाताच्या मऊपणासाठी ताज्या कोरफडीच्या पात्यातून गर काढावा आणि तो हातास लावावा. पंधरा वीस मिनिटं हात तसेच ठेवावेत. नंतर हात गार पाण्यानं धूवावेत. आठवड्यातून किमान दोन वेळेस हा उपचार केल्यास खरबरीत हात लवकर मऊ होतात.

सनस्क्रीन लावा

बाहेर जाण्यापूर्वी हातावर सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे सूर्यकिरणांचा तुमच्या हातावर परिणाम होण्यापासून प्रतिबंधित करते.

हातमोजे घाला

थंड हवेमुळे हात सहज कोरडे होऊ शकतात. तुम्ही जेव्हाही बाहेर जाता तेव्हा हातमोजे घालून तुमचे हात सुरक्षित ठेवू शकता.

हेही वाचा >> Health Care: फळे खाल्ल्यानंतर इतका वेळ चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर होतील ‘या’ गंभीर समस्या!

बीट आणि साखर

या दोन्ही गोष्टींचा वापर करून तुम्ही हातांसाठी घरच्या घरी उत्तम स्क्रब तयार करू शकता. यासाठी मध्यम आकाराचे दोन बीट आणि अर्धी वाटी साखर लागेल. बीट किसून घ्या. त्यामध्ये साखर टाका. आता या स्क्रबने तुमच्या हातांना मसाज करा. साधारण एकेका हाताला ७ ते ८ मिनिट हलक्या हाताने मसाज करा. यामुळे हाताच्या त्वचेखाली रक्ताभिसरण उत्तम होईल आणि हात चमकदार, नितळ दिसतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get smooth baby soft hands home remedies to get smooth and baby soft hands srk