Rava Papad Recipe : उन्हाळा लवकरच सुरू होणार आहे. उन्हाळ्यात सगळ्यांच्या घरी पापड बनवण्याची लगबग सुरू असते. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवतात. पापड बनवणं खरं तर इतकं सोपं नसतं. एखादं प्रमाण बिघडलं की पापड पण बिघडू शकतात. त्यामुळे अनेक महिला बाजारातून पापड खरेदी करण पसंत करतात. पण आज आम्ही तुम्हाला पापड बनवण्याची झटपट रेसिपी सांगणार आहोत. न भिजवता आणि न लाटता फक्त १० मिनिटांत रव्याचे पापड कसे बनवायचे याची भन्नाट रेसिपी आज जाणून घेऊया. फक्त काही प्रमाणात रवा वापरून तुम्ही वर्षभर टिकणारे पापड बनवू शकता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- रव्याचे पापड बनवण्यासाठी सर्वात आधी वाटीभर रवा मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा मैदा घाला.
- या दोघांचे मिश्रण एका वाडग्यात काढून घ्या. आणि त्यात २ सुक्या लाल मिरच्या बारीक करून घाला.
- त्यानंतर त्यात १ चमचा जीरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ सुद्धा घाला.
- यामध्ये पाणी घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
- त्यानंतर एका कढईत एक लिटर पाणी घालून हे पाणी उकळवा.
- या पाण्यावर जाळीचं झाकण ठेवा आणि त्यावर लहान लहान झाकणांमध्ये हे मिश्रण घालून वाफवून घ्या.
- झाकणांवर पापड घालण्याआधी तेल लावून ग्रीस करून घ्या.
- वाफवल्यानंतर हे पापड चांगले सुकवायला ठेवा.
- पापड चांगले सुकले की ते तळून पाहा. वर्षभरसाठी तुम्ही हे पापड साठवून ठेवू शकता.
First published on: 09-03-2023 at 19:48 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crunchy rava suji papad in only 10 minutes know instant recipe gps