Premium

How to Stop Snoring : तुमच्या जोडीदाराला घोरण्याची सवय आहे का? या ट्रिक्सच्या मदतीने करा त्यांची सुटका!

How to Stop Snoring : अनेक उपाय करूनही काही लोकांची घोरण्याची सवय सुटत नाही. या सवयीपासून सुटका कशी मिळवायची, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

How to Stop Snoring do you partner have habit of snoring
तुमच्या जोडीदाराला घोरण्याची सवय आहे का? या ट्रिक्सच्या मदतीने करा त्यांची सुटका! (Photo : Freepik)

How to Stop Snoring : काही लोकांना प्रचंड घोरण्याची सवय असते. त्यांच्या या सवयीमुळे अनेकदा त्यांच्याबरोबर झोपणाऱ्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो. या घोरण्याच्या सवयीमुळे इतर लोकही नीट झोपू शकत नाहीत. अनेक उपाय करूनही काही लोकांची ही सवय सुटत नाही. या सवयीपासून सुटका कशी मिळवायची, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यक्ती का घोरते?

घोरण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जेव्हा झोपेत श्वास घ्यायला आणि सोडायला व्यक्तीला त्रास होतो तेव्हा व्यक्ती झोपेत जोरजोराने श्वास घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जो आवाज निर्माण होतो; त्यालाच आपण घोरणे, असे म्हणतो. त्याशिवाय उतारवय, वजनवाढ, नाकाच्या समस्या, गरोदरपणा आणि झोपण्याची पद्धत इत्यादी कारणांमुळेही व्यक्ती जोरजोराने घोरते.

हेही वाचा : भाजीत तेल जास्त झालंय? टेन्शन घेऊ नका, या ट्रिकने झटक्यात वेगळं करा तेल

घोरण्याची सवय कशी बंद करावी?

  • नाक अस्वच्छ असेल, तर श्वास घेणे आणि सोडणे कठीण जाते. त्यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे नियमित नाक स्वच्छ ठेवावे. सर्दी-खोकला असताना कदाचित तुम्ही घोरू शकता; पण तुम्हाला नियमित घोरण्याची सवय असेल, तर नाकाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.
  • अनेकदा तु्म्हाला जाणवले असेल की, लठ्ठ माणसे खूप जास्त घोरतात. जर तुमचे वजनही खूप जास्त असेल आणि तुम्हाला घोरण्याची सवय असेल, तर सर्वात आधी वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे फक्त घोरण्याचीच समस्या नाही, तर आरोग्याच्या इतर अनेक समस्यांपासूनही तुम्ही सुटका मिळवू शकता.

हेही वाचा : नेहमी मोमोज खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

  • तुम्ही कसे झोपता, यावरही बरेच काही अवलंबून असते. जर तुम्हाला पाठीवर भार देऊन झोपायची सवय असेल, तर तुम्हाला कदाचित घोरण्याची सवय असू शकते. अशा वेळी नेहमी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपावे. एकाच पोझिशनमध्ये कधीही झोपू नये. सतत पोझिशन बदलावी.
  • खूप जास्त पाणी प्यावे, असे डॉक्टर नेहमी सांगतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकदा नाक आणि टाळू चिकट होतात. त्यामुळे घोरण्याची समस्या वाढू शकते. त्यासाठी भरपूर पाणी पिणे तितकेच गरजेचे आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to stop snoring do you partner have habit of snoring try these jugaad and tricks snoring remedies ndj

First published on: 12-09-2023 at 17:13 IST
Next Story
भेंडीची भाजी आठवड्यातून किती वेळा खावी? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याबाबत अन् भेंडी खाण्याचे फायदे …