Beauty Tips For Lips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून ओठ फुटतात हे समजू शकतो, मात्र उन्हाळ्यात ओठ फुटतात तेव्हा प्रश्न पडतो. उन्हाळ्यात वातावरणातील ओलावाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. ओलावा कमी झाल्यामुळे, ओठ कोरडे होण्याची प्रक्रिया सुरू होते. जर तुम्हीही फाटलेल्या ओठांनी त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फाटलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावल्यास एक-दोन दिवसांत तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. नारळाच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे ओठांना मऊ आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खोबरेल तेल वापरा
सर्वप्रथम, तुम्हाला तुमचे ओठ कोमट पाण्याने धुवावे लागतील, तुमचे ओठ कोरडे करा आणि हलक्या हातांनी तेलाने मसाज करा. रात्रभर ओठांवर खोबरेल तेल लावा, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने धुवा आणि दोन दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.

कोरफड वापर
याशिवाय, कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर कोरफडीचे जेल लावू शकता, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते धुवा. काही दिवसात तुम्हाला यातूनही आराम मिळेल.

हे घरगुती उपाय करा

या दोन गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. जर तुम्हालाही फाटलेल्या ओठांचा त्रास होत असेल तर तुम्ही त्यावर मध लावू शकता. असे म्हटले जाते की मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. हे लावल्याने तुमचे ओठ मऊ राहतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याच्या मदतीने लिप बाम तयार करू शकता.

दुधाची साय

तुम्हालाही रूक्ष ओठांचा त्रास होत असेल. तर, दुधाची साय तुमची यातून सुटका करू शकेल. त्यासाठी दुधाची साय ओठांवर लावल्याने फायदा होतो.

हेही वाचा >> गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम

हळद आणि दूध

हळद अनेक आजारांवर औषध म्हणून काम करते. ओठांना ठिक करण्यासाठीही हळद आणि दुधाची घट्ट पेस्ट बनवा. ती ओठांवर लावा आणि थोड्यावेळाने ओठ धुवून टाका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to treat dry and chapped lips using home remedies beauty tips for lips home remedies for chapped lips in summer try these tips srk
Show comments