२०२२ मध्ये ‘या’ ४ राशींचे भाग्य बदलू शकते, धनाची देवता कुबेरची असेल विशेष कृपा!

या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत यश मिळण्याची दाट शक्यता असते. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी.

astrology
फोटो: जनसत्ता

2022 Lucky Zodiac Signs: नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ जवळ आली आहे. नवीन वर्षाबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. हे वर्ष त्याच्यासाठी यशस्वी व्हावे, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याची सर्व कामे होतील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. तर आम्ही तुम्हाला सांगतो की ज्योतिष शास्त्रानुसार हे नवीन वर्ष ४ राशीच्या लोकांसाठी सर्वात खास असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत यश मिळण्याची दाट शक्यता असते. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी.

सिंह

या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष अतिशय शुभ राहण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. तुमची अनेक कामे यावर्षी होताना दिसत आहेत. तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल. या वर्षी नवीन काम सुरू करता येईल. हे वर्ष संपत्ती आणि अन्नात वाढ होईल. धनाची देवता कुबेरची तुमच्यावर विशेष कृपा असेल.

(हे ही वाचा: ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ ४ राशींचे पुरुष आपल्या पत्नीवर करतात खूप प्रेम!)

वृश्चिक

या राशीच्या लोकांना नवीन वर्षात अनेक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. इच्छित नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. या वर्षभर पैशाची आवक राहील. धनाची देवता कुबेरची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमवू शकाल.

(हे ही वाचा: Shani Gochar 2022: नवीन वर्षात ‘या’ राशींवर होऊ शकते शनिदेवाची कृपा!)

तूळ

या राशीच्या लोकांसाठीही नवीन वर्ष शुभ आहे. विशेषतः तुमच्या आर्थिक बाबींसाठी. या वर्षी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुवर्ण यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची जीवनशैली चांगली राहील. तुम्हाला लाभ मिळण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील.

(हे ही वाचा: पोस्‍ट ऑफिस की SBI कोण देणार नवीन वर्षात FD अधिक रिटर्न? जाणून घ्या)

मकर

हे वर्ष तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल. या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल असे दिसते. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. नोकरीत बदल होऊ शकतो. पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In 2022 the fate of this 4 zodiac sign may change kubera the god of wealth will have special grace ttg

Next Story
१ जानेवारीपासून तुमच्या खिशाला बसणार फटका; जाणून घ्या काय बदल होणार आहेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी