Kidney Failure: Causes, Symptoms & Treatment: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किडनी निकामी होणे हे जागतिक स्तरावर मृत्यूचे १७ वे प्रमुख कारण आहे आणि भारतात मृत्यूचे ८ वे प्रमुख कारण आहे. WHO च्या अहवालानुसार, दरवर्षी २ लाखांहून अधिक लोक किडनी निकामी होण्याचा त्रास सहन करतात. दरवर्षी फक्त ५,००० लोक प्रत्यारोपण करतात. WHO च्या मते अवयव दानाविषयी जागरूकतेचा अभाव आणि देणगीदारांची संख्या कमी असल्याने भारतात प्रत्यारोपणासाठी किडनी उपलब्ध नाहीत. देशात दरवर्षी गंभीर किडनीच्या आजारांचे दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही या आजाराची मुख्य कारणे आहेत.
किडनी निकामी होणे म्हणजे काय?
किडनी निकामी होणे म्हणजे किडनीचे कार्य १५% पेक्षा कमी झाले आहे. मूत्रपिंड निकामी होण्याच्या काही दिवस आधी शरीरात लक्षणे दिसू लागतात. फोर्टिस हॉस्पिटल, नोएडा येथील नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांटच्या अतिरिक्त संचालक आणि प्रमुख डॉ. अनुजा पोरवाल यांनी सांगितले की, “मूत्रपिंडाच्या आजाराचे संकेत देणारी अनेक चेतावणी चिन्हे आहेत. पण, बहुतेक प्रकरणांमध्ये ते लक्षात येत नाहीत. ही लक्षणे एकतर दुर्लक्षित केली जातात. चला जाणून घेऊयात किडनीचे कार्य बिघडल्याची कोणती लक्षणं आहेत.
ही १६ लक्षणे किडनीचे कार्य बिघडल्याचे संकेत देतात
- अशक्तपणा
- गोंधळ
- मळमळ
- उलट्या
- अंतर्गत रक्तस्त्राव
- उच्च रक्तदाब
- भूक न लागणे
- वारंवार लघवी होणे
- अशक्तपणा किंवा थकवा
- हात, पाय आणि चेहरा सूज येणे
- सकाळी उलट्या होणे किंवा मळमळ होणे
- अस्पष्ट वजन कमी होणे
- तोंडात धातूची चव येणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- बधीरपणा आणि मुंग्या येणे
गुरुग्राम येथील नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सुदीप सिंग सचदेव यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने त्याच्या लघवीच्या स्रावावर खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, रुग्ण कमी लघवी करू शकतो किंवा जास्त वेळा लघवी करण्याची गरज भासू शकते, विशेषतः रात्री.
हे मूत्रपिंडाच्या फिल्टरिंग युनिट्सना नुकसान झाल्याचे किंवा नुकसान होण्याच्या प्रक्रियेत असल्याचे लक्षण असू शकते. कधीकधी हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे (UTI) किंवा पुरुषांमध्ये, वाढलेल्या प्रोस्टेटचे लक्षणदेखील असू शकते. जर असे काही दिसून आले तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
तुमचे मूत्रपिंड कसे निरोगी ठेवावे
डॉ. सुदीप सिंग यांच्या मते, तुमच्या आहारात सोडियम किंवा मीठाचे प्रमाण नियंत्रित करा. याचा अर्थ पॅकेज्ड/रेस्टॉरंटमधील पदार्थ टाळणे. तसेच तुमच्या जेवणात अतिरिक्त मीठ घालणे टाळा. जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांवरचा भार वाढतो. मिठाचे सेवन कमी केल्याने केवळ उच्च रक्तदाबाशी संबंधित आजारांना प्रतिबंध होत नाही तर मूत्रपिंडाच्या आजाराची प्रगतीदेखील मंदावते.
निरोगी आहार घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. तसेच, तुमचे कोलेस्ट्रॉल नियमितपणे तपासा. मधुमेही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे खूप सामान्य आहे आणि लवकर निदान झाल्यास ते टाळता येऊ शकते, म्हणून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहणे चांगले.
याशिवाय, जर दररोज नाही तर आठवड्यातून ७ दिवसांपैकी किमान ५ दिवस सुमारे ४५ मिनिटे जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, रॅकेट गेम्स असे खेळ खेळा आणि हलका व्यायाम करून निरोगी जीवनशैली राखा. तुमची बैठी जीवनशैली बदला, ऑफिसमध्ये फिरायला जा किंवा जेवणानंतर फिरायला जा किंवा सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करा.