Kitchen Jugaad Video: भारतीय मसाल्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो, ज्यात हिरवी वेलची ही फार महत्त्वाची ठरते. गोड पदार्थ असो वा तिखट, हिरव्या वेलचीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात वेलची सहज उपलब्ध असते. जेवण रूचकर करण्यासाठी वेलचीचा सहज वापर केला जातो. गृहिणी रोजची एक सवय म्हणून जेवणात वेलची टाकतात. वेलचीमुळे जेवणाची चव वाढते आणि सुगंधामुळे खाण्याची ओढ वाढते.
पण तुम्ही कधी गॅसवर स्वयंपाक करताना वेलची ठेवली आहे का? तुम्हालाही वाटत असेल की, आम्ही तुम्हाला कसा विचित्र प्रश्न विचारतोय, पण एका गृहिणीने असा जुगाड सोशल मिडियावर दाखविला आहे. जे पाहून तुम्हीही चक्कीत व्हाल. गोड पदार्थात सुगंध येण्यासाठी आपण वेलची घालतो, पण ती वापरण्याआधी ‘हे’ केलं नाही, तर तुमचा पदार्थ फसण्याची शक्यता जास्त असते. सोशल मीडियावर सध्या एका साध्याशा पण भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. अनेक गृहिणींनी ‘हा’ उपाय पाहून डोक्यावर हात मारून घेतला. काय आहे नेमका हा वेलचीचा किचन जुगाड? आणि ती गॅसवर ठेवण्यामागचं खरं कारण काय? वाचा सविस्तर…
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट “किचन जुगाड” जबरदस्त व्हायरल होत आहे. एका गृहिणीनं सांगितलेली आणि दाखवलेली ही टीप खरोखर उपयोगी ठरणारी आहे. ती म्हणते, “वेलची वापरण्याआधी ती गॅसवर गरम करून घ्या.”
सोपं आहे, गॅसवर तुम्ही जेवण बनवत असता, त्याचवेळी गॅस स्टोव्हच्या कोपऱ्यात एक-दोन वेलच्या ठेवा. काही मिनिटांनी त्या बाजूला काढा… आणि मग पाहा कमाल, गरम झाल्यावर वेलची पुन्हा कुरकुरीत होते, अगदी ताजी वाटते आणि हो, तिची पूडही मग नीट होते. नाहीतर, दोन दिवस ठेवली की वेलची नरम पडते आणि वापरताना त्रास होतो. पण, हा जुगाड म्हणजे गेमच बदलून टाकतो.
पण, फक्त चव आणि सुगंधासाठीच वेलची वापरायची? अजिबात नाही! वेलची म्हणजे घरातलं नैसर्गिक औषध. वेलची खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
- तोंडाची दुर्गंधी वेलचीतील अँटीबॅक्टेरियल गुण बॅक्टेरिया नष्ट करतात.
- रक्तदाबाचा त्रास वेलचीतील अँटीऑक्सिडंट्स आणि ड्युरेटिक घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.
- अपचन, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता? एक वेलची तुमचं पचन सुधारू शकते.
- सर्दी, खोकला, दम्याच्या लक्षणांवर वेलची उपयुक्त ठरते. ती छातीत साचलेला कफ कमी करते.
Avika Rawat Foods या यूट्यूब चॅनेलवर या जुगाडाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
येथे पाहा व्हिडीओ
तर मग वेलची फक्त चहात किंवा खिरीमध्येच टाका असं नव्हे, ती आधी थोडीशी गरम करा… आणि मग पाहा, चव, सुगंध आणि आरोग्य एकत्र कसं मिळतंय!
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)