Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू भारतीय संस्कृतीत नेहमीच महत्त्वाचे मानले गेले आहेत. लग्नसमारंभ असो वा धार्मिक विधी, सोनं आणि चांदीच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, अनेकदा या वस्तूंची शुद्धता तपासणे कठीण जाते आणि ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तसे पाहाता आता लोकांना खरं-खोटं सोनं आता ओळखता येतं, पण खोटं चांदी ओळखणं अनेकांना समजत नाही. पण हीच चांदी फक्त फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला समजेल खरी आहे की खोटी…

एका महिलेनं सांगितल्याप्रमाणे चांदीचे दागीने फ्रीजमध्ये ठेवल्यानं तुमचे खरंच पैसे वाचणार आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चांदीवर तुम्हाला बर्फ ठेवायचा आहे. आता जर चांदीवर बर्फ ठेवल्यावर तो लगेच वितळत असेल तर याचा अर्थ चांदीमध्ये आणखी वेगळे धातू मिक्स करुन तो दागीना बनवला आहे. याचा अर्थ चांदी खोटी आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर @AvikaRawatFoods या युट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.