सध्या प्रत्येकाचे जीवन हे खूप दमछाक करणारे आणि धावपळीचे बनले आहे. दैनंदिन कामात प्रत्येक जण इतके व्यस्त होतात की कधी कधी आपल्या जेवणाच्या वेळा देखील मागे पुढे होतात. या सर्व धावपळीमध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही किंवा ती घेणे शक्य होत नाही. जेवणाच्या वेळा चुकल्यामुळे, रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. चवीला गोड असणारे आणि दिसायला लाल रंगाचे असणारे सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. सफरचंदाचे फायदे पाहून डॉक्टर रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. सफरचंदांमध्ये कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात. आज आपण सफरचंद खाण्याचे आरोग्याला काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
रोज सफरचंद खाण्याचे फायदे
वजन कमी होऊ शकते
रोज सफरचंद खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंदांमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात पाण्याचे प्रमाणही चांगले असते. सफरचंद खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि त्यामुळे भूक कमी लागते. त्यामुळे रोज सफरचंद खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा : Health Special: डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
हृदयाच्या आरोग्यासाठी असते चांगले
फायबरचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. सफरचंदाचे खाल्ल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. सफरचंदात भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. यासोबत शरीराला पेक्टिनचे प्रमाणही चांगले मिळते. सफरचंद नेहमी साल न काढता खावे. रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते.
प्रतिकारक शक्ती वाढते
सफरचंदाचे सेवन केल्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता कमी असते. तसेच तुम्ही वारंवार आजारी देखील पडत नाही. दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे किंवा ज्यांना कमी दिसत आहे, त्यांनी आपल्या आहारात सफरचंदांचा समावेश करावा.
हेही वाचा : Apple Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे ५ फायदे, कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रणात
शरीरात शरीरात विषारी द्रव्ये जमा झाल्यामुळे अनेक अवयव प्रभावित होतात. यकृत हा देखील या अवयवांपैकी एक आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी सफरचंदाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. सफरचंद शरीराला मॅलिक अॅसिड देखील प्रदान करते जे शरीरातील अशुद्ध पदार्थ काढून टाकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. योग्य उपाय डॉटरांचा सल्ला घेऊनच करावा.)