Natural Remedies for Cholesterol: बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सर्वांनाच परिचित आहे. पण, तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे केवळ एक यशस्वी हृदयशल्यचिकित्सक (Cardiothoracic Surgeon) नाहीत, तर लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही झाले आहेत. डॉ. नेने हे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमी फिट राहण्यासाठीचे सल्ले, डाएट टिप्स आणि हेल्दी ड्रिंक्सच्या रेसिपीज शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी एक असं पारंपरिक पेय सांगितलं आहे, ज्यामुळे केवळ उन्हाळ्यात शरीर थंड राहत नाही तर कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.

कुठलं आहे हे चमत्कारिक पेय?

डॉ. नेने यांनी ‘बार्ली वॉटर’ (जवाचं पाणी) ज्याला आपण जवस म्हणून देखील ओळखतो. हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याचा खुलासा केला आहे. दिसायला साधं असलेलं हे पेय खरं तर शरीरासाठी अमृतासमान आहे. उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्याबरोबरच शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढण्याचं काम हे करतं. बार्लीचे पाणी पोषक तत्वांनी समृद्ध असते, जे पचन सुधारण्यासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासोबतच ते त्वचेची चमकदेखील वाढवते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच ते एकूण आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे.

हृदयाचं आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण

डॉ. नेने यांच्या मते, बार्ली वॉटरमधील सोल्युबल फायबर आणि बीटा-ग्लुकान्स हे घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. पचनसंस्थेत कोलेस्ट्रॉलशी हे फायबर बांधलं जातं आणि शरीरातून ते सहज बाहेर टाकलं जातं, त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि हार्ट हेल्थ सुधारतं.

बार्ली वॉटर कसं बनवायचं?

डॉ. नेने यांनी रेसिपीही सांगितली आहे

  • १/४ कप बार्लीचे दाणे ४ कप पाण्यात टाका.
  • ५ ते १० मिनिटं उकळवा.
  • नंतर गाळून घ्या.
  • यात थोडं मीठ, मध आणि लिंबाचा रस घाला.
  • थंड करून प्यायला द्या – झालं तयार बार्ली वॉटर!

आरोग्याचे बहुपदरी फायदे

  • पचन सुधारणा : फायबरमुळे पोट साफ राहतं, बद्धकोष्ठतेवर नियंत्रण मिळतं.
  • ब्लड शुगर कंट्रोल : डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठी उपयोगी.
  • वजन नियंत्रण : पोट लवकर भरल्याची भावना निर्माण करून भूक कमी करते.
  • किडनी हेल्थ : हे नैसर्गिक मूत्रजल (Diuretic) असल्याने किडनी स्वच्छ ठेवतं व टॉक्सिन्स बाहेर काढतं.

थोडक्यात, डॉ. नेने यांनी सांगितलेलं जवाचं पाणी हे केवळ उन्हाळ्यातलं थंडगार पेय नाही, तर कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचं आरोग्य जपणारं नैसर्गिक औषध आहे. तुम्ही अजून बार्ली वॉटर ट्राय केलं नसेल तर आजच घरच्या घरी करून पाहा – कदाचित याच पेयाने तुमच्या हृदयाला मिळेल नवं जीवन!