Best Wishes for Students of HSC Class 12th: दहावी आणि बारावी हे आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे टप्पे असतात. या दोन्ही परीक्षा चांगल्या गुणांनी उतीर्ण होणं प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. आज ५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होत आहे. अशा स्थितीत तुम्ही देखील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी येथे काही शुभेच्छा संदेश देत आहोत. हे संदेश पाठवून किंवा स्टेटसला ठेवून तुम्ही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करू शकता आणि त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देऊ शकता. मेहनत केल्यानंतर यश मिळते आणि यश मिळाल्यावर आनंद मिळतो. हा मेहनीतीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यासाठी या शुभेच्छा नक्की पाठवा. तुमच्या कौतुकाच्या दोन शब्दांनी त्यांना आणखी ऊर्जा मिळेल.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन

सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा
तुमच्या या यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!

बारावी परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन
उज्ज्वल भविष्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा

मेहनत नेहमी फळाला येते
हे तू पुन्हा एकदा दाखवून दाखवलंस
या यशासाठी खूप खूप अभिनंदन

Direct link to check Maharashtra HSC Result 2025

आयुष्य आता खऱ्या अर्थाने आता सुरू होत आहे
आयुष्याचे नवे धडे गिरविण्यासाठी आता सज्ज होणार
बारावीत मिळवलेल्या यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन…

यश मिळवून, आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय
बारावीत परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन!
यापुढेही यशाचे अत्युच्च शिखर तुम्ही गाठत राहो
सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन!

तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा..
तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..!

अप्रतिम यश!
चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन
उज्ज्वल भविष्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा