बहुतेक भारतीय घरांमध्ये रोज सकाळी एक प्रश्न हमखास विचारला जातो, आज नाश्त्यासाठी काय हवे आहे? आपल्यापैकी बहुतेक जण झटपट बनवता येईल, जो चविष्टअसेल आणि जास्त काळ पोट भरलेले राहील असा पर्याय शोधत असतात. बहुतेजण मसाला ओट्ससारखे झटपट तयार होणारे आणि सोपा पर्याय निवडतात तर काहीजण पारंपारिक पद्धतीने बनवले जाणारे पोहे खातात. दोन्ही पर्याय पोटासाठी हलके, बनवायला सोपे आणि सामान्यत: आरोग्यदायी मानले जातात. पण त्या रोजच्या धावपाळीच्या जीवनशैलीमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत सलग काम करावे लागते आणि त्या दरम्यान थोडीसुद्धा विश्रांती घेता येत नाही त्यामुळे असा काहीतरी पर्याय हवा असतो जो तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवू शकेल आणि पौष्टिक देखील असेल. पण पोहे आणि ओट्स यापैकी कोणता पर्याय पौष्टिक आणि पोट भरलेले ठेवण्यासाठी चांगला आहे?

ओट्सचे आरोग्य फायदे (Health Benefits Of Oats)

ओट्स खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया. स्वयंपाकघरातील या पदार्थाचे काही आरोग्य फायदे येथे आहेत:

१. रक्तदाब नियंत्रणात ठेवते ( Keeps Blood Pressure In Check)

ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रक्तदाब पातळी राखण्यास मदत करतात. ते नायट्रिक ऑक्साईड वायू तयार करते जे रक्तवाहिन्यांमधून रक्ताची सुरळीत हालचाल करण्यास मदत करते.

२. वजन कमी करण्यास मदत करते (Promotes Weight Loss)

ओट्समधील विरघळणारे तंतू अन्न जलद विघटन करण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन सुरळीत होते. या प्रक्रियेत अतिरिक्त कॅलरीज नष्ट होतात, ज्यामुळे वजन कमी होते.

३. उर्जेचा उत्कृष्ट स्रोत (Excellent Source Of Energy)

१०० ग्रॅम ओट्समध्ये १६.९ ग्रॅम प्रथिने असतात, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. ते शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देण्यास देखील मदत करते.

४. मधुमेहींसाठी चांगले (Good For Diabetics)

मधुमेह मुख्यतः शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे होतो. ओट्समधील बीटा-ग्लुकन कंपाऊंड एक जाड थर बनवते जे पोट भरलेले ठेवते आणि रक्तप्रवाहात ग्लुकोज शोषण्यास प्रतिबंध करते.

पोह्याचे आरोग्यदायी फायदे: (Health Benefits Of Poha)

पोहे खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो:

१. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते (Controls Blood Sugar Levels)

कारण पोहे फायबरने समृद्ध असते, त्यामुळे मधुमेहींसाठी पोहे हा एक चांगला आहार मानला जातो. ते रक्तप्रवाहात साखर हळूहळू आणि स्थिरपणे सोडण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.

२. एक चांगला प्रोबायोटिक (A Good Probiotic)

तांदूळ उकळवून आणि नंतर काही तास उन्हात वाळवून पोहे तयार केले जातात.. पोहे हे किण्वन प्रकियेतून तयार गेले आहे आणि त्यामुळे अंशत: पचलेल्या कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांमधील सूक्ष्मजीव वनस्पती टिकवून ठेवते, जे आतड्यांसाठी आरोग्यदायी आहे.

३. आरोग्यदायी कार्बोहायड्रेट (Healthy Carb)

पोहे प्रत्यक्षात ७६.९ टक्के कार्बोहायड्रेट्स आणि सुमारे २३ टक्के फॅट्सपासून बनवले जातात. यामुळे ते एक उत्तम नाश्ता अन्न ठरते कारण ते शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.

४. सहज पचते (Easily Digestible)

पोहे पोटासाठी हलके आणि सहज पचणारे आहे, ज्यामुळे ते सकाळच्या नाश्त्यासाठी एक परिपूर्ण पदार्थ बनते. त्यामुळे पोटफुगी देखील होणार नाही.

मसाला ओट्स हा एक पौष्टिक नाश्ता पर्याय का आहे?(What Makes Masala Oats A Nutritious Breakfast Option?)

ओट्समध्ये फायबर भरपूर असते हे नाकारता येत नाही, ज्यामुळे ते तुमच्यासाठी एक पॉवरहाऊस घटक बनतात. उलट, ओट्समध्ये बीटा-ग्लुकन असते. बीटा-ग्लुकन हे एक विरघळणारे फायबर आहे जे पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. नोव्हेंबर २०२१ च्या एका संशोधननुसार, “बीटा-ग्लुकन केवळ तृप्ति वाढवत नाही तर भूक वाढवणारे संप्रेरक(हॉर्मोन्स) नियंत्रित करण्यास देखील मदत करते. पण, बाजारातून खरेदी केलेले इन्स्टंट मसाला ओट्समध्ये सोडियम, चव वाढवणारे घटक आणि खूप कमी प्रथिने असतात. याचा अर्थ असा की,ते खाल्यानंतर तुमचे पोट लगेच भरलेले वाटू शकते, पण जर ते उकडलेले अंडे, पनीर किंवा अगदी मूठ भर काजू यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांबरोबर ते खाल्ले नाही तर ही(पोट भरल्याची) भावना जास्त काळ टिकू शकत नाही.

पोहा हा पौष्टिक नाश्त्यासाठी योग्य पर्याय का आहे?(What Makes Poha A Nutritious Breakfast Option?)

पोहा हा हलका पर्याय वाटू शकतो, पण त्यात बरेच काही आहे. पोहे हे तांदळापासून बनवले जाते, जे पचवणे सोपे असते. जेव्हा तुम्ही ते शेंगदाणे, मोहरी, कढीपत्ता आणि थोडे लिंबू घालून बनवता तेव्हा त्यात कार्बोहायड्रेट्स, आरोग्यदायी फॅट्स आणि थोडे प्रथिने अशा संतुलित आहार ठरते. पोषक तत्वांचा हा चांगला समतोल तुम्हाला जास्त काळ पोटभर राहण्यास मदत करतो. ‘अ‍ॅडव्हान्सेस इन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या २०१५ च्या संशोधनानुसार, ठज्या जेवणात अनेक मॅक्रोन्यूट्रिएंट्स, विशेषतः फॅट आणि प्रथिने असतात, ते फक्त कार्बोहायड्रेट्सपेक्षा तुमची भूक कमी करण्यास मदत करतात.ठ

मसाला ओट्स की पोहे: कोणता पदार्थ जास्त काळ पोट भरलेले ठेवू शकतो?(Masala Oats Vs. Poha: Which Can Keep You Full For Long?)

मसाला ओट्स आणि पोहे दोन्हीचे आरोग्यासाठी फायदे आहेत, परंतु पोहे कायमस्वरूपी पोटभर खाण्याच्या बाबतीत चांगले असतात, विशेषतः जर तुम्ही ते योग्यरित्या तयार केले तर. जर तुम्ही हलके, तंतुमय आणि पचनसंस्थेसाठी योग्य आणि सोपा पर्याय शोधत असाल तर ओट्स उत्तम आहेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर घटकांमुळे मधुमेहींसाठी तो एक चांगला नाश्ता पर्याय देखील बनतात. परंतु जर तुम्हाला असा नाश्ता हवा असेल जो तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करेल, तर स्प्राउट्स किंवा पनीर सारख्या काही प्रथिनेयुक्त पर्यायांसह पोहे खाणे चांगले ठरेल.

मसाला ओट्स किंवा पोह्यांची निवड पूर्णपणे तुमच्या आरोग्याच्या ध्येयांवर अवलंबून असते. जर तुम्हाला कमी कॅलरी असलेला पर्याय हवा असेल जो तुमच्या पोटासाठी देखील हलका असेल, तर पोहे खा! पण जर तुम्हाला तुमच्या नाश्त्यामध्ये अधिक फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थ हवे असतील तर मसाला ओट्स निवडा पण ते घरी तयार केलेले असावे.