बीअर (Beer) प्यायल्याने त्याची नशा फक्त तुम्हालाच नाही तर डासांनाही चढते! नेदरलँड्स (Netherlands) मधील एका नव्या डच (Dutch) संशोधनातून समोर आलं आहे की, बीअर पिणाऱ्या लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात, म्हणजेच त्यांना डास जास्त चावतात. टीओआयच्या वृत्तानुसार, संशोधकांना आढळले की,”बीअर प्यायलेले लोक इतरांच्या तुलनेत १.३५ पट अधिक डासांना आकर्षित करतात. त्यामुळे त्यांना डासांच्या चावण्याचा आणि त्यांच्याद्वारे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. हे संशोधन स्पष्ट करतं की,”आपल्या जीवनशैलीच्या सवयी, जसं की मद्यपान (Alcohol Consumption) किंवा सनस्क्रीनचा वापर थेट डासांच्या वर्तनावर परिणाम करू शकतात आणि धोकादायक रोगजनकांच्या (Dangerous Pathogens) संपर्क येऊ शकतात.

डासांना आकर्षित करणारा विचित्र प्रयोग (The unusual experiment around mosquito attention)

नेदरलँड्समधील रॅडबाउड युनिव्हर्सिटी नायमेगेन (Radboud University Nijmegen) येथील शास्त्रज्ञांनी हे संशोधन लोवलँड्स म्युझिक फेस्टिव्हल (Lowlands Music Festival) येथे केलं. या प्रयोगात ५०० स्वयंसेवकांना सहभागी करून घेतलं. प्रत्येकाने त्यांच्या आहार, स्वच्छता आणि सवयींबाबत प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग आपला हात एका खास डब्यात टाकला ज्यात हजारो मादी डास ठेवले होते. हे डास वास घेऊ शकत होते पण चावू शकत नव्हते. त्यामुळे शास्त्रज्ञांना त्यांचा लँडिंग बिहेव्हिअर (Landing Behavior) आणि आकर्षणाचे निरीक्षण करता आलं.

अभ्यासात हेही निष्पन्न झालं की, जे लोक सनस्क्रीन वापरत नाहीत, आंघोळ टाळतात किंवा झोपताना बेड शेअर करतात, त्यांच्याकडेही डास अधिक आकर्षित होतात. अशा सवयींमुळे शरीराचा वास (Body Odor) आणि त्वचेची रासायनिक रचना (Skin Chemistry) बदलते — आणि डास हेच संकेत वापरून आपल्या बळीचा शोध घेतात.

डासांना बीअर प्यायलेले लोक का आवडतात?(Why mosquitoes love drinkers)

प्रत्यक्षात मद्य नव्हे, तर मद्य प्यायल्यानंतर शरीरावर जो परिणाम होतो तो डासांना आकर्षित करतो. बीअर पिणाऱ्यांच्या शरीरात काही रासायनिक बदल (Body Chemistry Changes) होतात, हालचाल आणि घामाच्या स्वरूपात बदल होतो आणि हे सगळं डासांसाठी आकर्षक वास निर्माण करतं. मागील संशोधनांनुसार, डास माणसाचा वास ३५० फूटांवरून सुद्धा ओळखू शकतात!

उपाय आणि खबरदारी (Implications and precautions)

हा अभ्यास जरी तरुण, फेस्टिव्हलमध्ये जाणाऱ्या लोकांपुरता मर्यादित असला तरी त्याचे परिणाम संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचे आहेत. डासांपासून संरक्षणासाठी तज्ज्ञांनी काही सोप्या उपायांचा सल्ला दिला आहे:

  • बीअर आणि अल्कोहोलचं प्रमाण मर्यादित ठेवा
  • सनस्क्रीन नियमित वापरा
  • चांगली वैयक्तिक स्वच्छता राखा

कारण डास हे मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), आणि झिका (Zika) सारख्या गंभीर आजारांचे प्रमुख वाहक आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही थंड बीअर उघडणार असाल, तर लक्षात ठेवा, पार्टीत तुम्ही एकटे नाही आहात, कारण डाससुद्धा तुमच्या आजूबाजूला चीयर्स” करत असतील