आपण फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवतो. अपल्याला असं वाटतं की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. मात्र, सगळ्याच खाद्यपदार्थांबाबत असं नाहीये. भाज्या आणि फळांसोबतच काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते आणि असे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे कधीही टाळावे. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती भाज्या किंवा खाद्यपदार्थ आहेत ज्यांना फ्रीजमध्ये कधीही ठेऊ नये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) टोमॅटो

टोमॅटो ठेवण्यासाठी सर्वात चांगली जागा फ्रीजमध्ये नाही तर उष्णतेमध्ये आहे. फ्रीजच्या थंड तापमानामुळे त्यांची चव खराब होऊ शकते. टोमॅटो हे सूर्यप्रकाशात उगवणारे फळ आहे जे कडाक्याच्या थंडीत खराब होते. तुम्ही जर टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर तुमचे टोमॅटो खराब होऊ शकतात. आपल्याला टोमॅटो दररोज जेवणात लागतो. अशावेळी जर आपण फ्रिजमधल्या टोमॅटोचा वापर करत असू, तर त्याची चव देखील बिघडते तसंच आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे टोमॅटो सहसा बाहेरच ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.

( हे ही वाचा: Shravan 2022: श्रावणाचा पवित्र महिना लवकरच सुरू होतोय; जाणून घ्या उपवासाच्या खास टिप्स)

२) केळी

केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होतात. केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो, ज्यामुळे आजूबाजूची फळेही लवकर पिकतात. त्यामुळे केळी फ्रीजमध्ये चुकूनही ठेऊ नये. त्यांना स्वयंपाकघरात ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा एका बास्केटमध्ये ठेवा ज्याने केळी खराब होणार नाहीत. केळी बाहेरच्या वातावरणातच लवकर पिकतात. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चवही बिघडते. तसंच ही थंड आणि खराब केळी आपल्या आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकतात.

३) ब्रेड

भरपूर जण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, असं चुकूनही करू नये. ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्याने खूप लवकर सुकतो. त्यामुळे ब्रेडमध्ये असलेला ओलावा नाहीसा होतो. असा ब्रेड चवीस तसेच आरोग्यास देखील हानिकारक असतो. म्हणून, ब्रेड साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ब्रेड बॉक्समध्ये ठेवणे किंवा स्वयंपाकघरात ठेवणे. असं केल्याने ब्रेड देखील चांगला राहतो आणि खराबही होत नाही.

( हे ही वाचा: पावसाळ्यात ‘या’ हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम)

४) बटाटा

जर तुम्हाला बटाटे दीर्घकाळ टिकावे असं वाटतं असेल तर त्याला टिकवून ठेवण्यासाठी बटाटे खोलीच्या तापमानाला ठेवावा लागेल. किंवा बाहेर भाजीच्या टोपलीत ठेवण्याचा प्रयत्न करा. याने बटाटे लवकर खराब होत नाहीत. जर तुम्ही फ्रीजमध्ये बटाटे ठेवत असाल, तर ते लवकर खराब देखील होतात तसंच त्यांना मोड देखील येतात. अशामुळे हे बटाटे आरोग्यासाठी हानिकारक असतात.

५) लसूण

लसूण फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. जेव्हा तुम्ही लसूण फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा ते सक्रिय होते आणि लवकर उगवते. म्हणजे त्याला मोड येतात. अशावेळी त्याची चवही खराब होते. तसंच असे मोड आलेले लसूण खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लसूण फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी तुम्ही बाहेर ठेवा. असं केल्याने त्याला लवकर मोड देखील येणार नाहीत तसंच ते खराबही होणार नाहीत. एका विशिष्ट डब्यामध्ये बंद करून देखील तुम्ही लसूण ठेऊ शकता. याने ते दीर्घकाळ टिकतील सुद्धा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never make the mistake of keeping these things in the fridge it can cause serious health damage gps