दूध हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. लहान बाळासाठी पूर्णान्न असलेले दूध आपण वेगवेगळ्या मोठे झालो तरीही पितो. काहींना दूध अजिबात आवडत नाही तर काहींना खूप जास्त आवडते. पण कॅल्शियम आणि प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले दूध आहारात असायलाच हवे.  दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम दातांसाठी आवश्यक असते. मुलांना अनेकदा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण आरोग्यासाठी दूध फार महत्वाचे आहे. दुधामुळे शरीर निरोगी राहते. तसेच त्वचा चमकदार होण्यासाठी व त्वचेवरील अशुद्धता काढून टाकण्यासाठी दूध फायदेशीर ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खास करून कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास त्याचे अनेक फायदे होतात. दुधामध्ये फॅट्स, प्रथिने चांगल्या प्रमाणात असते. तसेच दुधात असणारा क्लिंजिंग या गुणधर्मामुळे चेहरा देखील स्वच होण्यास मदत होते. कच्च्या दुधाचा वापर चेहऱ्यावर कसा करता येतो व त्यामुळे चेहऱ्याला कोणकोणते फायदे होतात ते पाहुयात.

हेही वाचा : Health Tips: युरिक अ‍ॅसिड वाढले आहे? मग ‘हे’ चार घरगुती खाद्यपदार्थ वापरून पाहा; मिळेल आराम

चेहऱ्यासाठी कच्य्या दुधाचा वापर

कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. कच्चे दूध चेहऱ्याला आवश्यक आर्द्रता प्रदान करते. चेहऱ्यावर बारीक रेषा किंवा सुरकुत्या येण्यापासून प्रतिबंधित करते. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी, तेच त्वचेचा निस्तेजपणा दूर करण्यासाठी व त्वचेववर चमक येण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करता येऊ शकतो.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर केला जाऊ शकतो. हे कच्चे दूध चेहऱ्याला लावण्याचे दोन पर्याय आहेत. त्यातला पहिला म्हणजे दूध जसे आहे तसे हाताने चेहऱ्याला लावणे . तसेच दुसरे म्हणजे एका भांड्यामध्ये कच्चे दूध घ्यावे. त्यांनंतर त्यात कापूस बुडवून त्याच्या मदतीने दूध चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होते. कच्च्या दुधात गुलाबपाणी मिसळून देखील तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.

कच्चे दूध आणि टोमटो

कच्चे दूध आणि टोमॅटो एकत्र करून देखील तुम्ही ते चेहऱ्याला लावू शकता. सर्वात आधी २ ते ३ चमचे टोमॅटोचा रस घ्यावा. याच प्रमाणात काचे दूध घेऊन हे मिश्रण एकत्र करावे. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी हे मिश्रण तुम्ही लावू शकता. हे मिश्रण साधारणपणे १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे. चेहरा धुतल्यानंतर चेहरा तजेलदार होतो.

हेही वाचा : Kitchen Jugaad Video: सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवा आणि असा वापरा; महिलाच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठा फायदा

दही आणि दूध

दही आणि दुधाचा फेस मास्क चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तरुण राहण्यास मदत होते. म्हणजेच या फेसपॅकमुळे त्वचा तरुण राहते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दह्यात थोडेसे कच्चे दूध मिसळावे. ही पेस्ट घट्ट करावी. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raw milk curd tomato pack how to apply milk for dark spots on face check all details tmb 01