How To Clean Bathroom Bucket and Mug: तुमचं बाथरुम स्वच्छ दिसतंय, पण बादली आणि मगवरचे डाग अजून लक्ष वेधत आहेत का? कितीही घासलं तरी ते जुने फिकट डाग काही जातच नाहीत? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. फक्त काही घरगुती उपाय करून तुम्ही केवळ काही मिनिटांत आपल्या बाथरूममधील गंध,
आणि डागांनी भरलेल्या बादल्या व मगांना पुन्हा नव्यासारखा चमकदार लूक देऊ शकता, तेही कोणतेही महागडं केमिकल न वापरता.

आपण अनेक वेळा बाथरुम साफ करताना अंघोळीच्या बादल्या आणि मगच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, या भांड्यांवर पाण्याचे, साबणाचे डाग, कळकटपणा आणि एक मेणचट थर जमू लागतात, ते दिसायलाही वाईट आणि आरोग्यासाठीही धोकादायक. पण, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण काही सोपे आणि घरगुती उपाय अवलंबून तुम्ही अवघ्या काही मिनिटांत तुमची बादली आणि मग झगमगीत करू शकता.

१. लिंबू आणि डिटर्जंटचा जबरदस्त फॉर्म्युला

लिंबामध्ये असतात नैसर्गिक ब्लीचिंग घटक. कसे वापरावे: डिटर्जंट पावडरमध्ये अर्धे लिंबू पिळा आणि थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट मग व बादलीवर लावून काही मिनिटांनी स्क्रबरने चोळा. लगेचच चमक नजरेत भरेल.

२. ब्लीच पावडरची खोलवर सफाई

ब्लीचमुळे दुर्गंधी आणि बॅक्टेरिया दोन्हीचा नाश होतो. कसे वापरावे: एक कप ब्लीच पावडरमध्ये थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. बादली-मगवर लावा, १५-२० मिनिटांनी स्क्रबरने साफ करा. पिवळसरपणा पूर्ण हटेल.

३. बेकिंग सोडा + व्हिनेगर

हे दोन घटक एकत्र आले की चमत्कार घडतो. कसे वापरावे: २ चमचे बेकिंग सोड्यामध्ये १ चमचा व्हिनेगर मिसळा, त्याची पेस्ट बादली व मगवर लावून काही मिनिटांनी स्क्रबरने घासा. कोपरा-कोपरा स्वच्छ होईल.

४. डिश सोप, लिंबू आणि बेकिंग सोडा

जिद्दी डागांसाठी अचूक उपाय. कसे वापरावे: डिश सोप, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. १० मिनिटे भिजवून ठेवा आणि मग स्वच्छता करा. चमक डोळ्यात भरेल.

५. हायड्रोजन पेरॉक्साईडची डीप क्लीनिंग ट्रिक

बॅक्टेरिया आणि फंगल हटवण्यासाठी सर्वोत्तम. कसे वापरावे: एक मग पाण्यात काही चमचे हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. ब्रशच्या मदतीने हे मिश्रण बादली आणि मगवर लावा. काही वेळाने धुऊन टाका.

आता महागडे क्लिनर वापरण्याची गरज नाही. हे उपाय तुम्हाला घरातले जुने भांडेही नवेच वाटेल, इतकं झगमगीत करतील. एकदा करून पाहाच…