Shravan Somvar 2025 Wishes in Marathi: श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ‘श्रवण’ नक्षत्रात असतो. त्यामुळे या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. हा महिना विशेषतः भगवान शिवशंकराला समर्पित मानला जातो आणि शिवभक्तांसाठी तो अत्यंत पवित्र असतो.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित असतो आणि भक्त मोठ्या श्रद्धेने या दिवशी उपवास आणि पूजा करतात. यंदा या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा संदेश व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा (Shravan Somvar Wishes in Marathi)

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ॥
श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा।

कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ॥
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

एक पुष्प, एक बेलपत्र,
एक तांब्या पाण्याची धार।
भोळे शिवप्रभू करतील सर्वांचा उद्धार,
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा।

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत, शिव ब्रह्म आहे,
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

“दुःख दारिद्र्य नष्ट होवो,
सुख-समृद्धी दारी येवो,
या श्रावण सोमवारच्या शुभ दिनी ,
तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होवो”
श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!

श्रावण सोमवारच्या मराठी शुभेच्छा आणि संदेश (Shravan Somwar Shubhechha Photos Marathi)

‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात,
श्रावण महिन्याचा पहिला सोमवार,
शिवशंकराच्या कृपेने तुमच्या आयुष्यात,
सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो!
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

बम बम भोले!
श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी,
भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत.
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

देवाधी देव महादेव
तुम्हाला नेहमी आरोग्य, धनधान्य आणि सदैव आनंद देवो.
श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!

श्रावणाच्या पवित्र महिन्यात,
भगवान शंकराच्या कृपेने
तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो.
श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा!

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये विश्वास,
ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये सर्व संसार,
ॐ ने करा दिवसाची चांगली सुरुवात,
श्रावणी सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!