Skin Cancer Treatment: ड्रायफ्रूट्स आणि बिया खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे फक्त आरोग्य चांगले राहते असे नाही, तर अनेक आजारांपासूनही बचाव होतो. अलीकडे झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की रोजच्या आहारात नट्स आणि बियांचा वापर केल्याने फक्त आरोग्यच नाही तर त्वचेलाही कॅन्सरपासून वाचवता येते. कारण या खाद्यपदार्थांमध्ये असलेले व्हिटॅमिन B3 (ज्याला नायसिन किंवा निकोटिनामाइड म्हणतात) त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते आणि स्किन कॅन्सरचा धोका कमी करते.

संशोधनातून काय समोर आले?

अमेरिकेतील वेंडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरने केलेल्या अभ्यासानुसार, सुकामेवा आणि बियांमध्ये व्हिटॅमिन B3 चे एक रूप सहज उपलब्ध आहे. या संशोधनात ३३,००० पेक्षा जास्त माजी सैनिकांवर अभ्यास केला गेला. ज्यांनी B3 सप्लिमेंट घेतले, त्यांच्यात स्किन कॅन्सरचा धोका १४% कमी आढळला. तर ज्यांना आधीच स्किन कॅन्सर झाला होता, त्यांच्यात हा धोका ५४% पर्यंत कमी दिसला. हा अभ्यास JAMA Dermatology या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे.

व्हिटॅमिन बी३ काय करते? (Skin Cancer Food)

व्हिटॅमिन B3 शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे त्वचेच्या पेशींना मजबूत करते, मज्जासंस्था आणि पचनक्रिया सुधारते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्याच्या किरणांमुळे होणारे DNA नुकसान दुरुस्त करण्यात मदत करते. म्हणूनच वैज्ञानिक याला त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव करण्याचा नैसर्गिक उपाय मानतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?

रिसर्चचे लेखक डॉ. ली व्हील्स यांनी एनपीआरला सांगितले की, इतकी मोठी रिस्क कमी झालेली पाहून मी आश्चर्यचकित झालो. हा खरोखरच अपेक्षेपेक्षा जास्त चांगला परिणाम आहे. या शोधामुळे डॉक्टरांना आता स्किन कॅन्सरच्या जास्त धोका असलेल्या रुग्णांसाठी एक स्वस्त आणि सुरक्षित पर्याय मिळाला आहे. रिसर्चनुसार, निकोटिनामाइड म्हणजेच व्हिटॅमिन B3 चे एक रूप अशा लोकांसाठी जास्त फायदेशीर ठरू शकते, ज्यांना आधी स्किन कॅन्सर झाला आहे आणि जे जास्त वेळ उन्हात राहतात. तसेच वयोवृद्ध लोक ज्यांची स्किन सेल्स दुरुस्त करण्याची क्षमता कमी झाली आहे.

कोणत्या बिया आणि सुका मेव्यांमधून व्हिटॅमिन B3 मिळते

व्हिटॅमिन B3 आपल्याला रोजच्या आहारातून मिळू शकते. बदाम, काजू, पिस्ता, सुर्यफूलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B3 असते. हे नियमित खाल्ल्याने शरीराला नायसिन आणि निकोटिनामाइड मिळते, ज्यामुळे त्वचेच्या पेशींची नैसर्गिक बचावशक्ती मजबूत होते.