stay away from sanitizer while bursting crackers this diwali know 5 rules of safety during corona | फटाके आणि सॅनिटायझर! दिवाळीत नेमकी काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर! | Loksatta

फटाके आणि सॅनिटायझर! दिवाळीत नेमकी काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर!

फटाके पेटवताना डोळ्यात ठिणगी गेली तर लगेच थंड पाण्याने डोळे धुवा.

फटाके आणि सॅनिटायझर! दिवाळीत नेमकी काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर!
फटाके फोडताना लहान मुलांच्या हातावर सॅनिटायझर लावू नका.(फोटो: FilePhoto)

गेल्या दोन वर्षांपासून आपण करोनासोबत जगायला शिकत आहोत. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी, आपल्याला सतत हात धुण्याची आणि हँड सॅनिटायझर लावण्याची सवय लागली आहे. दिवाळीचा सण जवळ आला आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घराचे अंगण दिव्यांनी उजळून निघेल, अशा परिस्थितीत तुम्हीही सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुम्ही सॅनिटायझर वापरत असाल तर आगीच्या संपर्कात येऊ नका नाहीतर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी सॅनिटायझर वापरत असाल तर कोणते सुरक्षा नियम पाळणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात

तुम्ही दिवे लावत असाल तर सॅनिटायझरपासून दूर राहा:

तुम्ही जर तुमच्या घरात दिवे लावत असाल तर सॅनिटायझर वापरू नका, याकरिता तुम्ही पाण्याने हात स्वच्छ धुवा. सॅनिटायझर अल्कोहोलपासून बनवले जाते. सॅनिटायझरच्या बाटलीमध्ये ७० टक्के अल्कोहोल असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही जर तुमच्या हातात सॅनिटायझर लावून दिवा किंवा फटाका लावला तर तुमच्या हाताला काही क्षणात आग लागण्याचा धोका असू शकतो. कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अल्कोहोल एक ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामुळे धोका टाळण्यासाठी, दिवा लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा.

या महत्वाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवा:

घरामध्ये फुलबाजे किंवा लहान फटाके पेटवू नका कारण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना आग लागण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पाण्याची बाटली सोबत ठेवा.

लहान मुलांच्या हातावर सॅनिटायझर लावू नका. मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा जेणेकरून त्यांच्या तोंडात फटाक्यांचा धूर जाणार नाही.

तुम्ही लहान मुलाजवळ जर फटाके पेटवत असाल तर काळजीपूर्वक फटाके पेटवा. तसेच फटाके पेटवताना सुती कापडाचा वापर करा. तर फुलबाजी पेटवतानाही मुलांना दूर ठेवा किंवा फटाके वाजवताना मुलांना एकटे सोडू नका.

फटाके पेटवताना डोळ्यात ठिणगी गेली तर लगेच थंड पाण्याने डोळे धुवा.

समजा दुर्देवाने फटाके वाजवताना तुमचा हात जळलेला असेल किंवा भाजला गेला असेल तर तुम्ही त्या हातावर क्रीम लावा. दरम्यान हे लक्षात ठेवा की, जखमेवर तूप किंवा तेल लावू नका याने भाजलेल्या भागात आणखीन जळजळ वाढेल. तसेच जळालेल्या भागावर कधीही थंड पाणी ओतू नका, याऐवजी जळजळ कमी होईपर्यंत सामान्य पाणी जळलेल्या भागावर ओतत रहा.

ही दिवाळी सर्वांची आनंदाची सुखाची जावो. ही सर्वांनी काळजी घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-10-2021 at 14:30 IST
Next Story
दिवाळीत तुम्हाला ग्लोइंग त्वचा हवीये, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश