गर्भधारणा आणि मासिक पाळीचा जवळचा संबंध आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हीही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल, तर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मासिक पाळीदरम्यान योग्य दिवस निवडल्यास सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. मासिक पाळीदरम्यान ३ ते ४ दिवस असे असतात, ज्यादरम्यान संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध स्त्रीरोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक यांच्यानुसार, प्रत्येक महिलेच्या मासिक पाळीचा कालावधी वेगवेगळा असतो. काहींचा हा कालावधी २४ दिवसांचा, २८ दिवसांचा, ३५ किंवा काहींचा ४० दिवसांचा असतो. ज्या महिलांच्या मासिक पाळीची तारीख ठरलेली असते त्यांचे प्रजनन दिवस शोधणे सोपे आहे. पण मासिक पाळी अनियमित असल्यास हे जाणून घेणे अवघड आहे.

पुराणिक यांच्या म्हणण्यानुसार, महिलांच्या मासिक पाळीच्या १२ ते १४ दिवस आधी ओव्हुलेशन होते. अंडाशयात अंड सोडले जाण्याच्या क्रियेला ओव्हुलेशन म्हटले जाते. ओव्हुलेशनच्या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. असे मानले की आज महिन्याची पहिली तारीख आहे. जर एखाद्या महिलेच्या मासिक पाळीचा कालावधी २४ दिवसांचा आहे, तर याच्या १२ ते १४ दिवस आधी तिचा ओव्हुलेशन कालावधी असेल. यानुसार १० ते १४ तारखेदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची संभावना वाढते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या महिलेचे मासिक चक्र २८ दिवसांचे असेल, तर तिचा ओव्हुलेशन कालावधी महिन्याच्या १४ तारखेच्या आसपास असेल.

Health Tips : तुम्हीही रात्री दोनपेक्षा जास्त वेळा लघवी करता? यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे; जाणून घ्या उपाय

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या महिलांचा मासिक चक्राचा कालावधी निश्चित आहे, त्यांचा प्रजनन कालावधी शोधणे शक्य आहे. जर एखाद्या महिलेची मासिक पाळी अनियमित असेल, तर तिच्या ओव्हुलेशन कालावधीचे निरीक्षण करावे लागेल. यासाठी सोनोग्राफीद्वारे केला जाणारा फॉलिक्युलर अभ्यास आणि घरबसल्या चाचणी करू शकतो असे डिजिटल ओव्हुलेशन किट, या दोन पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These days of the month are considered best for conception know the exact date according to the menstrual cycle ovulation period conceive pvp
First published on: 22-09-2022 at 11:33 IST