हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात पडणारे धुके, प्रदूषण, थंडीचे वातावरण यामुळे सर्दी, खोकला असे वायरल आजार होण्याचे प्रमाण वाढते. तर त्यांना श्वसनाशी निगडित काही आजार असतात, त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी काही भाज्या फायदेशीर ठरू शकतात. कोणत्या भाज्यांचा जेवणात समावेश करावा जाणून घ्या.
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी मदत करणाऱ्या भाज्या:
आणखी वाचा: ‘ही’ आहेत हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होण्याची कारणं; लगेच करा बदल
मेथी
मेथीच्या भाजीमध्ये नैसर्गिकरित्या उष्णता असते. हिवाळ्यात थंडीच्या वातावरणात याचा फायदा होतो. शरीरात उष्णता निर्माण झाल्याने थंडीमुळे होणारा त्रास टाळता येऊ शकतो. त्यामुळे मेथीच्या भाजीचा जेवणात समावेश करावा.
पालक
पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स आढळतात. तसेच पालक आयरनचे ही उत्तम स्रोत मानले जाते. यासह पालकमुळे मेटाबॉलिक रेट वाढतो, ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्यामुळे पालकची भाजी पौष्टिक मानली जाते.
कांद्याची भाजी
कांद्याची भाजीही पौष्टिक मानली जाते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि हिवाळ्यात होणाऱ्या आजरांपासून स्वतःचा बचाव करण्यास मदत मिळते.
