tips to prevent bananas from rotting | Loksatta

या उपायांनी केळीसह ‘हे’ 5 पदार्थ अधिक काळ टिकू शकतात, जाणून घ्या

फळे आणि भाज्या या ताज्या खाणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्याने शरीराला अधिक पोषक तत्वे मिळतात. मात्र, सर्वांना ताजे खाणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर फळे, सुके मेवे खराब होऊ नये, ते फ्रेश राहावे यासाठी पुढील टीप्स फायदेशीर ठरू शकतात.

या उपायांनी केळीसह ‘हे’ 5 पदार्थ अधिक काळ टिकू शकतात, जाणून घ्या
Photo : pexels

फळे आणि भाज्या या ताज्या खाणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्याने शरीराला अधिक पोषक तत्वे मिळतात. मात्र, सर्वांना ताजे खाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनके जण भाज्या, फळे फ्रिजमध्ये राखून ठेवतात. मात्र, फ्रिजमध्ये देखील ते खराब होतात. सध्या नवरात्री सुरू असल्याने लोक घरी फळ आणून ठेवतात. फळे, सुके मेवे खराब होऊ नये, ते फ्रेश राहावे यासाठी पुढील टिप्स फायदेशीर ठरू शकतात.

१) कोथिंबीर

कोथिंबीर ताजी राहावी यासाठी तिला पाण्यात ठेवा. कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. किंवा कोथिंबीर धुवून तिला सुकवा नंतर तिला टिश्यू पेपरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवून द्या.

(बोटांची साल निघते? मग ‘हे’ घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर)

२) केळी

केळींना कधी फ्रिजमध्ये स्टोर करून नये. थंडीत केळी अधिक पिकतात. केळी पिकू नये यासाठी केळीचे टोक जिथे आहे, ज्या ठिकाणापासून ती इतर केळींना जोडलेली आहे त्या ठिकाणी अ‍ॅल्युमिनियम फॉईल गुंडाळा. अ‍ॅल्युमिनियम फॉईल नसल्यास तुम्ही पॉलिथिन गुंडाळू शकता.

३) नट्स

अक्रोड, काजू सारखे नट्स फ्रेश आणि क्रंची ठेवण्यासाठी एअरटाइट बॉक्समध्ये ठेवून त्यांना फ्रिजमध्ये स्टोर करा.

४) कांदे

बटाटे आणि कांदे कधी सोबत ठेवू नका. कारण बटाट्यातून निघणारे रसायन हे कांदे खराब करू शकतात. त्यामुळे कांदे अधिक काळ टिकवण्यासाठी त्यांना बटाट्यासोबत ठेवू नका.

(चेहऱ्याप्रमाणे मानही उजळेल, काळेपणा दूर करण्यासाठी करा ‘हा’ उपाय)

५) लिंबू

लिंबू अधिक काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने ते ताजे राहतीलच असे नाही. त्यांना झिप लॉक पाऊच किंवा पॉलिथिनमध्ये ठेवा आणि त्यांना घट्ट बांधून ठेवा. जर तुम्ही त्यांचा रस काढणार असाल तर प्रथम ते कोमट पाण्यात टाका.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Shardiya Navratri 2022: नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करताय? मग ‘या’ गोष्टींची काळजी घ्याच

संबंधित बातम्या

दुपारच्या वेळी झोप घेणे आरोग्यासाठी वाईट आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक
युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
मूळव्याध, बद्धकोष्ठच्या त्रासाने हैराण? थंडीच्या सीझनमध्ये येणारं ‘हे’ फळ करतं अमृतासमान काम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सोलापुरात प्रहार संघटनेने कर्नाटक प्रवासी बसला फासले काळे; बसचालकाचा मात्र सत्कार
IND vs BAN 2nd ODI: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराजचे आक्रमक रुप, जाऊन भिडला नजमुल शांतोशी, video व्हायरल
‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
मुंबईचा कायापालट करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…