Most popular Vat purnima ukhane in marathi: वटपौर्णिमा हा महिलांसाठी अतिशय खास सण असतो. या दिवशी सर्व विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्याची देवाकडे प्रार्थना करतात. या निमित्ताने अनेक महिला एकत्र जमतात आणि एकमेकांची मस्करी करतात. यात उखाणे हा महत्त्वाचा सोहळा असतो. उखाण्यांच्या माध्यमातून अनेक महिला आपल्या पतीचे नाव घेतात. हे उखाणे अतिशय मनोरंजक असतात. उखाण्यांमध्ये आपल्या नवऱ्यांचं नाव घेणे ही परंपरागत पूर्वीपासून चालत आली आहे. हल्ली तर पती देखील उखाणे घेतात. वटपौर्णिमा देखील उखाण्यांनी तुम्ही खास बनवू शकता. असा झक्कास उखाणा की, पती देईल ७ जन्म साथ

कुंकवाचा साज, असाच हवाय
७ जन्मी…..राव नवरा म्हणून हवाय

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
…..राव आहे माझे सर्वस्व

शहा जहानने मुमताजसाठी, बांधला महाल ताज…..
रावांचे नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज

फुलांच्या बागेत, फुलली मोहक शेवंती,
….राव सुखी राहावेत, हि परमेश्वराला विनंती.

वटपौर्णिमा आहे खरं तर, सुवासिणींसाठी मोठा सण,….
रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन.

वटपौर्णिमा आहे खरं तर, सुवासिणींसाठी मोठा सण,
…रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी,
….रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या दिवशी.

वडाची पूजा करून, गुंडाळते पांढरा धागा,….
रावांच्या आयुष्यात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा

थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा,….
रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा

वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी, ….
रावांची होईन मी साताजन्माची राणी

वट सावित्रेला नमन करते, सृष्टी मुळे आनंदी आहे मनुष्य, …
रावांचे नाव घेते, त्यांना मिळूदे १०० वर्ष आयुष्य.

नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, ….
रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात प्रकाश

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मीच असावी जन्मोजन्मी

सोन्याच्या अंगठी वर आमच्या प्रेमाची खुण,
…. रावांचे नाव घेते …..ची सून

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
…..रावांच नाव घेऊन करते त्यांच्या आयुष्यात प्रवेश

आयुष्याच्या वाटेवर ….राव मी तुम्हाला साथ देईन,
पण जर तुमच्यासाठी एक शर्ट घेतला तर माझ्यासाठी चार साड्या पण घेईन.

९ to ५ जॉब करून, आयुष्याची लागली वाट,
मी जॉब सोडणार आता, कारण………..रावांचे बिझनेस आहेत सतराशे साठ.