How To Save Electricity Bill Through Fridge: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पावसाळा अजूनही सुरूच आहे. परंतु, अनेकांचे लाइट बिल कमी झाले नाही. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणेच वीज बिल येत आहे. तुम्हाला जर वीज बचत करायची असेल तर तुम्ही काही गोष्टीत बदल करू शकतात. तुम्हाला दर महिन्यातील विजेचे बिल कमी येईल.एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

फ्रिज हे आपल्यापैकी बहुतेकांच्या घरातले रोजच्या वापरातले एक आवश्यक उपकरण आहे. आपण याचा वापर खूप करतो, पण याची काळजी घेणे आणि स्वच्छता ठेवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. रेफ्रिजरेटर स्वच्छ ठेवणे केवळ त्या उपकरणाची कार्यक्षमता राखण्यासाठीच महत्त्वाचे नसून आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. विशेषतः रेफ्रिजरेटरच्या दारावरील रबर गॅस्केट, जे थंड हवा आत रोखून ठेवते आणि बाहेरील गरम हवा आत येण्यापासून प्रतिबंध करते. हा रबर जर खराब असेल तर त्यातली हवा आत बाहेर येते जाते आणि त्यामुळे विजबीलही जास्त येते. मात्र कापसाच्या उपायानं यापुढे पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल..

नेमकं काय करायचं?

सर्वप्रथ कापूस घ्यायचा त्याला डेटॉलमध्ये बुडवायचं आणि एका काठीला तो कापूस गुंडाळून घ्यायचा. त्यानंतर थोड्या पाण्यात हलका हा कापूस भिजवायचा. पुढे या काठीला गुंडाळलेला कापूस फ्रिजच्या अवघड जागी असणाऱ्या रबरमध्ये टाकून रबर गॅस्केटची स्वच्छता करा. डेटॉलमुळे घाण, चिकट पदार्थ आणि बुरशी सहजतेने निघून जाते. रबर स्वच्छ आणि ताजे राहते. नंतर स्वच्छ पाण्याने गॅस्केट पुसून घ्या. दोन दिवसातून एकदा हा उपाय करा, असा सल्ला या महिलेने दिला आहे. यामुळे वीज बिल कमी होतं, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे. असं केल्यानं फ्रिजमध्ये बर्फ साठणार नाही, आणि विजेचे बिलही कमी येईल.

पाहा व्हिडीओ

दुसरा उपाय

व्हिनेगर हे एक नैसर्गिक आणि प्रभावी स्वच्छता साधन आहे, जे रेफ्रिजरेटरच्या रबरची घाण आणि बुरशी काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरते. एक वाटी व्हिनेगर पाण्यात मिसळून, त्यात कापड बुडवून घ्या आणि त्याने रबर गॅस्केट स्वच्छ करा. व्हिनेगरमध्ये असलेले अम्ल घटक घाण, चिकट पदार्थ आणि बुरशी काढून टाकण्यात मदत करतात. व्हिनेगरचा चिकटपणा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी नंतर स्वच्छ पाण्याने गॅस्केट पुसून घ्या. हे केल्याने रबरवर कोणतेही अवशेष उरलेले नसतील.