दिवसभराची धावपळ आणि ताणतणावामुळे रात्रीच्या वेळी अनेकदा शांत झोप लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये लोक बेडवर झोपून रात्रभर कुस बदलत राहताता पण झोप काही येत नाही. अशा परिस्थितीमध्ये, दुसऱ्या दिवशी देखील तणावात जातो आणि आळस वाढतो. तसेच दिवसभर थकवा देखील जाणवतो. तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर तुम्ही काही हेल्दी पेय घेऊन शकता. तुम्हाला ऊर्जा देखील मिळेल आणि आळस देखील येत नाही.

गरम दूध

तुम्ही झोपण्यापूर्वी गरम दूध पिऊ शकता. आई-आजी यांनी सांगितलेला उपाय अत्यंत फायदेशीर आहे. खरं तर, झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिनमुळे झोप सुधारण्यास मदत होते.

अश्वगंधा दूध

अश्वगंधा दूध प्यायल्याने शांत झोप लागते त्याबरोबर झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. ते प्यायल्याने तणावर अन् चिंता कमी होऊ शकते अन् डोक शांत होते. हे कॉर्टिसोल हार्मोन्स देखील नियंत्रित करते ज्यामुळे शरीर आणि मनाला शांती मिळते. जर झोपण्याआधी साधारण ३० मिनिटे आधी ते प्या. त्यामुळे चांगली झोप येते.

केळीची स्मुदी

रात्री झोपण्यापूर्वी केळीची स्मुदी देखील पिऊ शकते. खरं तर केळ्यामध्ये मॅग्नेशिअम आणि पोट्रशिअम सारखे तत्व निर्माण होतात, जे स्नायूंवरील ताण कमी करते.

हळद दूध

हळदीचे दूध देखील तुम्ही झोपण्यापूर्वी पिऊ शकता. त्यामध्यी दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीर अन् थकावट कमी करू शकते. रात्रीच्या वेळी हळद दूध प्यायल्याने रोग प्रतिकार शक्ती चांगली होते ज्यामुळे शांत झोप लागते.