Banana for weight gain: शरिरयष्टी अनेकदा उपहासाचे कारण ठरते. काही लोक अत्यंत सडपातळ असतात तर काही लोक अत्यंत स्थूल असतात. सडपातळ शरीर पाहून अनेकदा लोक समोरच्या व्यक्तीला आजारी असल्याचे किंवा तंदुरुस्त नाही असे मानतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आहारात केळ नक्की समाविष्ट केले पाहिजे. हे फळ नैसर्गिकरित्या वजन वाढवू शकते. फक्त तुम्हाला के खाण्याचा योग मार्ग माहित असला पाहिजे.
काही लोक अत्यंत सडपातळ का असतात?(Why are some people extremely thin?)
काही मुले आणि मुली खूप सडपातळ असतात. याची अनेक कारणे असू शकतात. ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते. काही लोकांचे वजन आरोग्याच्या समस्यांमुळे वाढत नाही. पोषणाचा अभाव आणि योग्य आहाराचा अभाव यामुळे अनेक वेळा काही लोकांच्या शरीरातील हाडे दिसू लागतात.
सडपातळ लोकांनी जाड होण्यासाठी केळ कधी खाल्ले पाहिजे ( When to eat banana for weight gain)
केळ खाल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तसेच वजन वाढण्यासाठी मदत मिळते. जर तुम्हाला जाड व्हायचे असेल तर तुम्ही सकाळच्या वेळी केळ खाल्ले पाहिजे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी तुम्ही केळ खाऊ शकता.
जाड होण्यासाठी केळ कसे खावे? (Best way to eat bananas for weight gain)
जर तुम्हाला कोणत्याही सप्लिमेंटशिवाय नैसर्गिकरित्या वजन वाढवायचे असेल तर तुम्ही दुधाबरोबर केळी खावी. तुम्ही दूध अन् केळीचा शेक बनवून ते पिऊ शकता. हे केळ दुधात मॅश करूनही खाऊ शकता. केळी खाल्ल्यानंतर तुम्ही त्याच्या वरून दूध देखील पिऊ शकता. तुम्ही त्यात मध देखील मिसळू शकता.
वजन काढण्यासाठी किती केळ खाल्ली पाहिजे (How many bananas a day for muscle gain)
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, वजन वाढवण्यासाठी तुम्ही दिवसातून कमीत कमी २ वेळा केळी खावी. मुलांसाठी एक केळी पुरेसे आहे.