वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती वेळा खावे, याला ठराविक असा नियम नाही. तज्ज्ञांच्या मते, मुख्यत: संतुलित आहाराचे सेवन करून कॅलरी डेफिसिट (शरीराला लागणाऱ्या कॅलरीपेक्षा कमी कॅलरी घेणे) लक्ष केंद्रित केले पाहिजे.

बरेच लोक कमी वेळा पण जास्त प्रमाणात जेवणात यशस्वी होतात, तर काहीजण जास्त वेळा आणि कमी प्रमाणात जेवतात. पण वजन कमी करताना तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर लक्ष ठेवणे आणि तुमच्या दैनंदिन कॅलरीजच्या गरजा पूर्ण करण्यावर भर द्यावा. एकंदरीत, तुम्ही दिवसातून किती वेळा जेवता त्या तुलनेत आहाराची गुणवत्ता आणि दैनंदिन कॅलरीज सेवनाचा आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो.

वारंवार खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते का? (How does spacing your meals affect weight loss?)

काही डॉक्टरांच्या मते, वारंवार खाल्ल्यामुळे पचन चांगलं होतं आणि मेटाबॉलिझम (शरीरातील ऊर्जा वापरण्याची क्रिया) वाढू शकतो.

हे थर्मिक इफेक्ट ऑफ फूड या संकल्पनेवर आधारित आहे — म्हणजे अन्न पचवण्यासाठी शरीर किती कॅलरी खर्च करते.

असे मानले जाते की, दिवसभरात अनेक वेळा खाल्ल्याने शरीराचा मेटाबॉलिझम सक्रिय राहतो. मात्र, याबाबतचे पुरावे एकसंध नाहीत आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिवसभरात किती कॅलरी घेत आहात, हेच आहे.

वजन कमी करण्यासाठी नियमित नाश्ता करणे गरजेचे का? (Should you eat breakfast regularly for weight loss?)

नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा जेवण आहे असे सर्वत्र मानले जाते. अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे नाश्ता करतात त्यांना लठ्ठपणाचा धोका कमी होतो, मधुमेह होण्याचा धोका कमी होतो आणि संज्ञानात्मक कार्य सुधारते आणि त्याचबरोबर त्यांचे हृदय निरोगी राहते.पण, नाश्त्यामध्ये काय खाल्ले जाते हे देखील महत्त्वाच आहे साखरयुक्त धान्य(sugary cereal ) आणि जास्त प्रमाणात सॅच्युरेडेट फॅट्सस असलेले पदार्थ यासारखे कमी पौष्टिक नाश्ता नियमितपणे खाल्ल्याने वजन वाढणे, लठ्ठपणा आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आणि म्हणूनच, तुमच्या सकाळच्या जेवणाला ऊर्जा देण्यासाठी आणि तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि आरोग्यादायी फॅटसयुक्त पदार्थांनी समृद्ध असलेला नाश्ता निवडणे महत्त्वाचे आहे.

प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर, आणि हेल्दी फॅट्स असलेला नाश्ता दिवसभर ऊर्जा देतो आणि पोट भरल्यासारखे वाटते.

साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ असलेला नाश्ता केल्याने वजन वाढू शकते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

इंटरमिटंट फास्टिंग उपयुक्त का?(Does intermittent fasting work?

इंटरमिटंट फास्टिंगमध्ये ठराविक वेळेतच अन्न घेण्याची पद्धत आहे. तुम्ही दिवभरात किती वेळा जेवण करता यावर मर्यादा आणते यामुळे एकूण कॅलरीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि वजन कमी करण्यास मदत होते.पण ही पद्धत सगळ्यांसाठी योग्य नाही. काही आरोग्य स्थिती, वय, गरोदरपण, स्तनपान, किंवा वैयक्तिक वेळापत्रक यावर अवलंबून ही पद्धत योग्य नसेल. याचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.

तुमच्यासाठी योग्य आहार वेळापत्रक कसे ठरवावे? (How can you plan your meals?)

तुमचे वैयक्तिक आवडी निवडी, वेळापत्रक आणि आरोग्याची स्थिती पाहून दिवसातील जेवणाची संख्या ठरवावी. किती वेळा जेवलात यापेक्षा संपूर्ण दिवसभराती किती कॅलरी आणि पोषण मूल्य घेतले यावर भर द्या.

  • तुम्ही दिवसभरात तीन हलक्या जेवणाचे नियोजन करू शकता, जर:
  • तुमचे लवकर पोट भरत असेल तर
  • तुम्हाला मळमळ किंवा पचनाच्या तक्रारी असतील तर
  • तुमचे चयापचय (मेटाबॉलिझम) मंद गतीने होत असेल तर
  • तुम्ही दोन मोठ्या जेवणाचे नियोजन करू शकता, जर:
  • तुम्हाला किती प्रमाणात आहार घेता यावर नियंत्रण ठेवण्यात अडचण येत असेल तर..
  • तुम्हाला खाण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल तर..
  • तुमची जीवनशैली अत्यंत व्यस्त असेल तर